कापूस पट्ट्यात रेशीम धाग्यांची शेती

आमची साडेपाच एकर शेती आहे. पण रेशीम व्यवसायच अधिक परवडतो आहे. पत्नीदेखील माझ्या बरोबरीने राबते. आम्ही मजुरांवरील अवलंबत्व कमी केले आहे. प्रतिबॅचचा खर्च साधारण २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत जातो. उन्हाळ्याचे दिवस सोडले तर वर्षभर ही शेती सुरू ठेवतो. ताजे व हमखास उत्पन्न हाती पडते. रमेश जाधव
शेडमध्ये रेशीम अळ्यांचे संगोपन
शेडमध्ये रेशीम अळ्यांचे संगोपन

यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्‍यातील मुख्य पीक म्हणजे कापूस. मात्र तालुक्यातील वागद येथील रमेश जाधव यांना मात्र या पिकापेक्षा रेशीमशेतीच अधिक भावली आहे. वर्षांत रेशीम कोष निर्मितीच्या सुमारे पाच बॅचेस घेत त्यांनी ताजे उत्पन्न घेण्यावर भर दिला आहे. परिसरातील अन्य शेतकऱ्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेत रेशीमशेतीची वाट धरली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वागद (ता. महागाव) येथील रमेश जाधव यांना शेती तशी कमीच. दोन ठिकाणची मिळून साडेपाच एकर जाधव दांपत्याचे क्षेत्र आहे. मुलाने दाखवली रेशीम वाट जाधव यांचा मुलगा अजिंक्‍य एम.टेक.च्या अभ्यासक्रमासाठी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात शिकत होता. त्यानिमित्ताने त्याला परिसरातील विविध प्रयोग पाहण्याची संधी मिळाली. एकदा तो गावी आला. वडील-मुलात संवाद घडला. वडील(रमेश जाधव )- पोरा, आता काही कापूस पीक परवडेनासे झाले आहे. किडींचा त्रास वाढलाय. खर्चही वाढलाय. काही नवा पर्याय शोधावा म्हणतो.

अजिंक्य- अहो बाबा, तुम्हाला तेच सांगणार होतो. पश्चिम महाराष्ट्रात मी बरेच प्रयोग पाहिले. त्यातला रेशीमशेतीचा प्रयोग आपल्यासाठी फारच चांगला वाटला. चांगलं व्यवस्थापन केलं तर आपल्याला परवडेल ही शेती.

वडील- असं म्हणतोस? तशी आपल्या गाव परिसरात रेशीमशेती कोणी करीत नाही. आपणच पहिलं पाऊल टाकूया, ठरलं मग! रेशीम शेतीतील बारकावे जाणले वडील- आपल्या जिल्ह्यातल्या काही चांगल्या रेशीम उत्पादकांची नावं शोधून काढलीत मी!

अजिंक्य- अगदी चांगलं केलंत. त्यांची शेती प्रत्यक्ष पाहिली, बारकावे जाणले म्हणजे आत्मविश्वास वाढेल.

दिलेली भेट विडूळ- महेश बिच्चेवार, ढाणकी- श्री. मामीनवार, सुनील राठोड रेशीम शेतीला सुरवात निविष्ठा खरेदी बेणे- पुसद येथून एक रुपया प्रतिनगाप्रमाणे सुमारे साडेबारा हजार बेण्यांची खरेदी अंडीपूंज- यवतमाळ येथील रेशीम विकास अधिकारी यांच्याकडून घेतले. १७५ रुपयांना प्रति १०० नग असा दर होता; परंतु नवा प्रयोग असल्याने सुरवातीला ५० अंडीपूंजच खरेदी केले. शेड उभारणी

  • सुरवातीला भांडवल उपलब्ध नसल्याने बांबू, लाकडी ताट्यांपासून कच्चे शेड तयार केले.
  • आज मात्र ३० बाय ६० फूट आकाराचे पक्के शेड आहे. त्यासाठी सुमारे चार लाख ३० हजार रुपयांचा खर्च झाला. सुरवातीच्या उत्पन्नातून भांडवल उपलब्ध झालं. शेड उभारणारी व्यक्‍ती ओळखीची असल्याने त्यानेही टप्प्याटप्प्याने पैसे स्वीकारण्यास सहमती दर्शविली.
  • व्यवस्थापन व उत्पादन

  • अळ्यांना पाला टाकणे व अन्य कामे जाधव दांपत्यानेच केली. त्यामुळे मजुरीवरील खर्चही वाचला.
  • सुरवातीच्या काळात ५० अंडीपूंजापासून ५५ किलो चांगल्या प्रतीचे कोष उत्पादन
  • सिकंदराबाद येथे २३० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली.
  • स्थळ सिकंदराबाद ( संवाद) अजिंक्‍य- बाबा, इथं तर दोन-तीनच व्यापारी दिसतात. मग अपेक्षित दर कसा मिळणार? कर्नाटकातलं रामनगर हे कोषांसाठी मोठं मार्केट आहे. तिथं माल घेऊन गेलो तर? वडील- होय, मलाही तसंच वाटतं. आपण अनुभवी लोकांचा सल्लापण घेऊ. पहिला कटू अनुभव जाधव रामनगरला कोष घेऊन गेले. पण पहिला अनुभव, त्यात भाषेची अडचण त्यामुळे फसवणुकीचा कटू अनुभव आला. व्यापाऱ्यांनी दिलेले चेक बाउन्स झाले. फोनवरून विचारणा केली तर व्यापारी नोटाबंदीचे कारण सांगू लागले. तब्बल तीन वेळा असा प्रकार घडला. अखेरीस तेथील व्यवस्थापनाकडे तक्रार केली. मग मात्र व्यापाऱ्यांनी थेट रोखीने व्यवहार करण्यास सुरवात केली. आता त्यांच्याशी ओळख झाल्याने कोणता अडसर उरलेला नाही. जाधव यांची रेशीमशेती दृष्टिक्षेपात

  • सुमारे तीन वर्षांचा झाला अनुभव
  • दोन एकर तुती लागवड
  • टप्प्याटप्प्याने अंडीपुंजांची संख्या २००, २५० अशी वाढवली. आज ३०० अंडीपूंज घेतात.
  • आता वर्षभरात सुमारे पाच बॅचेस. सुमारे एक महिन्यात बॅच पूर्ण होते.
  • प्रतिशंभर अंडीपुंजांमागे कोष उत्पादन- ८० किलो
  • विक्रीसाठी वाहतूक

  • वागद ते नांदेड- बस
  • नांदेड ते बंगळूर- रेल्वे
  • तिकिटाव्यतिरिक्त १७५ रुपये प्रतिक्‍विंटल रेल्वे मालासाठी शुल्क आकारते.
  • प्रेरणा रमेश जाधव यांच्या रेशीमशेतीची प्रेरणा काही अंतरावर असलेल्या काळी दौलत खान येथील शेतकर्यांना मिळाली आहे. त्यातून दोन रेशीम युनीटस उभारली आहेत.   मुलांना उच्च शिक्षण अजिंक्य- एम.टेक.- सध्या अौरंगाबाद येथे लेक्चरर वीरेंद्र- नागभीड (जि. चंद्रपूर) येथील खासगी संस्थेत शिक्षक रमेश जाधव- ९७६७९४६८६९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com