सातारा जिल्ह्यात संरक्षित शेतीच्या दृष्टीने पॉलिहाऊस व शेडनेट उभारणी करण्याकडे कल कायम आहे. जिल्ह्यात पंधराशेच्यावर पॉलिहाऊस तर तीनशेपेक्षा अधिक शेडनेटस आहेत. अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह सक्षम करण्यासाठी संरक्षित शेती फायदेशीर ठरत आहे. नुने (ता. पाटण) येथील मंगल लक्ष्मण निकम या अल्पभूधारक शेतकरी महिला पाच गुंठे क्षेत्रात पॉलिहाऊसमध्ये ढोबळी मिरची घेते. पाच वर्षांपासून त्यातून यशस्वी उत्पादन घेत चांगले अर्थार्जनही केले जात आहे. सातारा जिल्ह्यातील नुने (ता. पाटण) येथील मंगल लक्ष्मण निकम अंगणवाडी सेविका आहेत. मात्र ही जबाबदारी सांभाळताना त्या पती लक्ष्मण यांच्यासह शेतीही पाहतात. मुलगी जयश्री, मुलगा सोमनाथदेखील आई-वडिलांना शिक्षण सांभाळून शेतीत मदत करतात. या कुटुंबास अवघी ३० गुंठे जमीन असून एक विहीर आहे. त्यातील १५ गुंठे वहिवाटीखाली आहे. सन २०१२ पर्यंत कुटुंबाचा उदरनिर्वाह दुग्धव्यवसाय तसेच अंगणवाडीच्या मानधनावर सुरू होता. दरम्यान नागठाणेचे कृषी सहाय्यक अंकुश सोनावले यांची भेट झाली. त्यांनी पॉलिहाऊस शेतीबद्दल माहिती दिली. अधिक अभ्यासाअंती ही शेती करायचे ठरवले. बॅंकेचे चार लाख रुपयांचे कर्ज काढून पाच गुंठे क्षेत्रात पॉलिहाऊसची उभारणी केली.
पॉलिहाऊस शेतीस प्रारंभ पहिल्या प्रयोगात रंगीत ढोबळी मिरचीची लागवड केली. शेडनेट तंत्रज्ञान शिकत शिकत लागवडीचे व्यवस्थापन केले. पहिल्या वर्षी लागवड खर्च काढणीपर्यत ४० हजार रुपये आला. सर्व मिरची वाशी मार्केटला पाठवली. मात्र व्यापाऱ्यांनी दर कमी दिल्याने तोटा सहन करावा लागला. या परिस्थितीत खचून जाता पुन्हा हिरव्या ढोबळी मिरचीची लागवड केली. पहिल्या अनुभवातून बऱ्याच बाबी शिकण्यास मिळाल्या. या वेळी विक्री मुंबई मार्केटला न करता स्थानिक बाजार तसेच सातारा येथे केली. यामुळे चांगला दर मिळण्यास मदत झाली. अनुभव तयार झाला आत्तापर्यंत पाच ते सहा वेळा पॉलिहाऊसमध्ये ढोबळी मिरची घेतली आहे. आता चांगला अनुभव तयार झाला आहे. सरासरी उत्पादन खर्च ४० ते ५० हजार रुपये येतो. तर चार ते साडेचार टन उत्पादन (पाच गुंठ्यांत) मिळते. निकम यांच्या शेतीतील ठळक बाबी
संपर्क- मंगल निकम - ९०६७३६५७०२. ८५५४०६७२७१
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.