लोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी क्षेत्रातील आचार्य पदवी असूनही संकटाने पाठ सोडली नाही. न खचता अळिंबी उत्पादनासारख्या अनवट कृषिपूरक उत्पादनाची वाट चोखाळत त्यांनी मार्ग काढला आहे. १५ लाखांचे कर्ज घेत अळिंबी उत्पादनाचा देवकेश हा ब्रॅण्ड तयार केला आहे. चिकाटी, सातत्य आणि कष्टाला नावीन्यतेची जोड देत आपला व्यवसाय वाढवत आहेत. जळगांव शहरापासून ३५ किलोमीटर अंतरावरील लोणी (ता. चोपडा) येथील अनिल केशव माळी यांनी कृषी कीटक शास्त्रामध्ये पीएच. डी. मिळवली असून, सुरवातीची काही वर्षे खासगी कंपनीमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम केले. मात्र, तो प्रकल्प काही कारणाने बंद झाला. मग त्यांनी २०१५ मध्ये अडावद (ता. चोपडा) येथे कृषी सेवा केंद्र सुरू केले. या अडचणीच्या काळात संपूर्ण कुटुंबाने आधार दिला. मात्र, एकाच उत्पन्न स्रोतावर अवलबूंन राहण्यापेक्षा अन्य पूरक व्यवसायाचाही शोध सुरू केला. २०१७-१८ मध्ये लोणी येथेच अळिंबी उत्पादन व्यवसाय सुरू केला. या व्यवसायासाठी बॅंकेकडून १५ लाख रुपये इतके कर्ज घेत भांडवल उभारले. अळिंबी उत्पादन, विक्री आणि प्रक्रिया उद्योगासाठी त्यांना ज्येष्ठ बंधू शशिकांत, भावजय सौ. कल्पना, पत्नी सौ. वंदना आणि मामेभाऊ प्रमोद माळी यांचे मोठे सहकार्य मिळते. अळिंबी उत्पादनातील महत्त्वाचे...
उत्पन्न व आर्थिक बाबी : योग्य वातावरण व वेळेचे नियोजन केल्यास अळिंबीचे चांगले उत्पादन मिळते. अनिल माळी यांच्या प्रकल्पातून प्रति माह सुमारे ४००- ५०० किलो ओली अळिंबी आणि ४० ते ५० किलो वाळलेली अळिंबी इतके अळिंबी उत्पादन होते. महिन्याकाठी ओले व वाळवलेल्या अळिंबींची १० ते २० हजार रुपयांपर्यंत विक्री होते. मात्र, एवढ्यावरच न थांबता अळिंबीपासून मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती केली जात आहे. त्यात वाळविलेल्या अळिंबीपासून भुकटी तयार करून, सूप, बिस्किट फार्मवर तयार करतात. भुकटी देऊन अन्य उत्पादकाकडून पापड, लोणचे, प्रो-विटा पावडर, बासुंदी, जॅम इ. अशी उत्पादने तयार करून घेतात. अशा उत्पादनांना बाजारात ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. मूल्यवर्धित उत्पादनामुळे फायद्यामध्ये वाढ होते. देवकेश ब्रॅंडची निर्मिती आणि विक्री नियोजन :
अळिंबी उत्पादनाची ताळेबंद ः अ) अनावर्ती खर्च : (सर्वसाधारण ) २ शेड हाऊस (१५०० चौ. फूट प्रत्येकी), शेडची मांडणी, रॅक (पोते), रसायने, स्प्रे पंप, थर्मामीटर, हायग्रोमीटर व अवजारे, काड भिजवण्यासाठी टाक्या यांची खरेदी एकाच वेळी करावी लागते. ब) आवर्ती खर्च : (सर्व साधारण ) १ पिशवी तयार करण्याकरिता येणारा खर्च : गहू भुस्सा, कुटार ः ३ किलो ः १५ रु. प्लॅस्टिक बॅग १ नग ः ३ रु. स्पॉन (१२५ ग्रॅम) ः १४ ते ३० रु. (अळिंबीच्या प्लुरोटस सजारकाजू आणि प्लुरोटस फ्लोरिडा अशा दोन प्रजाती असून, त्याचे दर अनुक्रमे ११० रुपये व २५० रुपये प्रति किलो असे आहेत. प्रजातीनुसार खर्च भिन्न येतो.) निर्जंतुकीकरण - ३ मजुरी - ५ इतर (सुतळी, पाणी, वीज अन्य) - २० एकूण - ६० ते ८० रुपये क) अपेक्षित उत्पादन व उत्पन्न : १) १ पिशवीपासून ८०० ते १००० ग्रॅम ताजी अळिंबी उत्पादन मिळते. ताज्या अळिंबीचा दर किरकोळ बाजारात ४०० रुपये प्रति किलो असला तरी घाऊक दर २०० रुपये प्रति किलो इतका आहे. २) १ किलो अळिंबी उत्पादनासाठी येणारा खर्च ः ६० ते ८० रु. ३) एखादी पिशवी खराब होणे, बिजांची उगवण न होणे, अन्य बुरशींची वाढ होणे या कारणांमुळे बॅचचे उत्पादन कमी होऊ शकते. याचा एकंदरित विचार करताना प्रति पिशवी साधारणपणे ७० ते ८० रुपये निव्वळ फायदा होतो. ४) पिशवी भरण्यापासून अळिंबी काढणीपर्यंत साधारण ३५ ते ४० दिवस लागतात. स्वच्छता व अन्य किरकोळ कामांचे दिवस धरले तर दोन महिन्यामध्ये अळिंबी उत्पादन हाती येते. वर्षात साधारण सहा बॅच होतात. ५) वर्षभर नियमित उत्पादनासाठी अनिल दर आठवड्याला १२० पिशव्या भरतात. (टीप : उत्पादन हे योग्य वातावरण व निगा यानुसार कमी अधिक होऊ शकते.) पाल कृषी विज्ञान केंद्राची मदत पाल कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरही अळिंबी उत्पादन सुरू आहे. परिसरातील तरुण शेतकरी, महिलांसाठी अळिंबी उत्पादन प्रशिक्षणाची सोय उपलब्ध आहे. अळिंबी उत्पादनामध्ये येणाऱ्या अडचणीसाठी कृषी विज्ञान केंद्राची मदत होते. संपर्क : डॉ. अनिल माळी, ९४२०२२८०३५ (लेखक महेश महाजन हे कृषी विज्ञान केंद्र, पाल, ता. रावेर, जि. जळगांव येथे विषय विशेषज्ञ - पीक संरक्षण आहेत.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.