राज्यात सर्वत्र कपाशी पिकात गुलाबी बोंड अळीचे संकट उभे ठाकले आहे. काही शेतकरी कामगंध सापळे, रेफ्यूजी बियाण्याचा वापर आदी उपायांद्वारे बोंड अळीला पिकापासून दूर ठेवण्याचे नेटके व्यवस्थापन करीत आहेत. कठोरा (ता. जि. जळगाव) येथील प्रगतिशील शेतकरी जगन्नाथ गोकुळ पाटील यांनीही सतर्कता बाळगत आपल्या १० एकरांत त्याच प्रकारचे आदर्श नियोजन करीत बोंड अळीला रोखण्याचे प्रयत्न केले आहेत. जळगाव जिल्ह्यातील कठोरा गाव तापी नदीकाठी आहे. येथील जगन्नाथ व बंधू सत्वशील या पाटील बंधूंची संयुक्त ४० एकर शेती आहे. केळी हे त्यांचे प्रमुख कापूस दुय्यम पीक आहे. सर्वच पिकांंत उत्तम व्यवस्थापन ठेवून नुकसान कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सिंचनासाठी कूपनलिका आहे. पाणी पुरेसे असतानाही ठिबकचा कार्यक्षम वापर ते करतात. जगन्नाथ यांचे कला शाखेतील पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. सत्वशील हे डॉक्टर अाहेत. तेही सवडीनुसार बंधूला मदत करतात. कपाशी शेतीतील नियोजन
रोखले गुलाबी बोंड अळीला
यंदा प्रादुर्भाव नाही
कापूस दर्जेदार मिळाला मागील वर्षीही त्यांनी वेळीच कापूस काढला. कीडग्रस्त कापसाचे प्रमाण त्यामुळे १७ टक्क्यांपर्यंतच राहिले. व्यापाऱ्याने गावातच येऊन खरेदी केली. सुरुवातीला जो आर्द्रतायुक्त कापूस आला तो वाळवून विकण्यात आला. त्याला ४३०० रुपये प्रतिक्विंटल दर सुरवातीला मिळाले. नोव्हेंबरच्या अखेरीस जी वेचणी झाली त्यात कापसाचा दर्जा अधिक चांगला होता. तो साठविला. साठवणुकीची सोय गावातच एका खोलीत केली जाते. या कापसाला ४८०० रुपयांपर्यंतचे दर मिळाले. फेब्रुवारीअखेरपर्यंत कापूस विक्री करायची. अधिक दिवस दरांची प्रतीक्षा करायची नाही, असे सूत्र पाटील यांनी ठेवले आहे. पऱ्हाट्यांचे व्यवस्थापन जानेवारीच्या मध्यापर्यंत क्षेत्र रिकामे करण्याचा प्रयत्न असतो. बोंड अळीसाठी पऱ्हाट्या हा आसऱ्याचा मुख्य स्त्रोत असतो. मागील वर्षीची स्थिती पाहता त्याचेच काटेकोर व्यवस्थापन केले. थेट पऱ्हाटीवर रोटाव्हेटर न फिरविता ती मजुरांकरवी उपटून घेतली जाते. गोळा करून मग जाळण्यात आली. यानंतर शेत भुसभुशीत करून मका किंवा हरभऱ्याची (काबुली) पेरणी केली.
आजार झाल्यानंतर उपचार घेण्याचा प्रकार अनेक जण करतात. परंतु, आजार होऊच नये, यासाठी अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. हे सूत्र लक्षात घेऊन, मी कापूस पिकासाठी प्रतिबंधात्मक उपाय करीत आहे. पूर्वहंगामी किंवा संरक्षित जलसाठा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी संयुक्त कृती करून, तसेच एकात्मीक उपायांमधून बोंड अळी रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. - जगन्नाथ पाटील, ८३२९७५११३२
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.