नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील वाकचौरे कुटुंबाने गुण्यागोविंदाने एकत्रीतपणे शेतीत राबत अभ्यास व परिश्रमातून प्रयोगशील, आदर्श शेती घडवली आहे. डाळिंब, ॲपलबेर, बांधावर विविध फळपिकांसह अन्य पिकांसह सेंद्रिय व्यवस्थापनावर भर देत प्रगतिशील शेतीचा प्रत्यय घडवला आहे. नगर जिल्ह्यात अकोले हा आदिवासी बहुल व निसर्गसंपन्न असा डोंगराळ तालुका आहे. या भागात जैवविविधता देखील चांगल्या प्रमाणात आहे. येथील अनेक शेतकऱ्यांनी विविध पिकांच्या देशी बियाण्यांचा संग्रह करून दुर्मीळ वाण जपण्याचा प्रयत्न केला आहे. तालुक्यातील डोंगरगाव येथे देविदास वाकचौरे यांची सुमारे ११ एकर शेती आहे. त्यात डाळिंब काही वर्षांपासून तर ॲपलबेरचे पीक सहा वर्षांपासून घेतले जात आहे. देविदास यांचा मुलगा संजय यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत अभ्यासूवृत्तीने व तंत्राचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने शेती फुलवली आहे. शेतीतील व्यवस्थापन
पाण्याचे नियोजन वाकचौरे हे मूळ पिंपळगाव निपाणी गावचे आहेत. त्यांनी १९९५ मध्ये डोंगरगाव येथे जमीन घेतली. शेतीला पाण्याची सोय नव्हती. मग तीन किलोमीटरवर देवठाण वीरगाव शिवारात जागा घेऊन तिथे विहीर खोदली. तिला मुबलक पाणी लागले. पिंपळगाव येथेही दोन विहिरी आहेत. डोंगरगाव येथे व धामोरी फाट्यावरील एक एकर अशा दोन्ही ठिकाणी शेततळे घेतले आहे. सुमारे तीन किलोमीटर अंतरावरून पाइपलाइन करून शेतात पाणी आणले आहे. डोंगरगाव येथेशेततळ्यात पाणी आणून त्यातून ग्रॅव्हिटीमार्फत म्हणजे वीज व मनुष्यबळाचा वापर न करता ११ एकरांतील शेतीला सिंचन केले जाते. वाकचौरे यांना पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे. संपर्क : संजय वाकचौरे ९८६०९३२७४४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.