पंधरा वर्षांपासून सीताफळ लागवडीत हातखंडा, फळाचा कांचन ब्रॅण्ड, लागवड पध्दतीचे व नव्या वाणांचे प्रयोग करण्यात अमरावती येथील विनय बोथरा यांनी नाव मिळवले आहे. त्यापुढे जाऊन कमी ग्रेडच्या फळांचे मूल्यवर्धन करून पल्पनिर्मिती केली व त्यास विदर्भातील बाजारपेठही मिळवली आहे. सध्या अमरावती येथे वास्तव्य असलेले विनय बोथरा यांची धनज (ता. कारंजा, जि. वाशीम) येथे शेती आहे. सन १९८९ मध्ये त्यांनी रोपवाटिका व्यवसाय सुरू केला. आजमितीला सागवान रोपांचा तब्बल सात राज्यांना पुरवठा ते करतात. १५ वर्षांपासून सीताफळ बाग फुलवून या पिकातही हातखंडा तयार केला आहे. सुमारे ४८ एकरांवर सीताफळ लागवड असून, १५ ते तीन वर्षे जुनी अशी झाडे त्यात आहेत. विनय सीताफळ महासंघाचे संचालकही आहेत. सीताफळ शेती
कांचन ब्रॅण्ड लोकप्रिय
प्रक्रियेतून मूल्यवर्धन ‘ए’ आणि ‘बी’ ग्रेडच्या फळांना चांगला दर मिळतो. मात्र लहान आकाराच्या (१५० ते २५० ग्रॅम) फळांना अपेक्षित दर मिळत नाही. त्यापासून पल्प (गर) तयार करून फळाचे मूल्यवर्धन करण्याचे ठरविले. विनय यांचा मुलगा ऋषभने ‘फूड टेक्नॉलॉजी’ विषयात ‘बी टेक’ केले आहे. त्याच्याकडे प्रक्रियेची जबाबदारी आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने (अकोला) सीताफळापासून गर वेगळे करणारे यंत्र विकसित केले आहे. वसई येथील उद्योजकाकडून ‘फूड ग्रेड’चे तसे यंत्र बनवून घेतले. त्यास दीड लाख रुपये खर्च आला. एक लाख ८० हजार रुपयांना ‘ब्लास्ट फ्रिझर’ खरेदी केला. पल्पमधील नैसर्गिक गुणधर्म टिकून राहावेत यासाठी त्याचा उपयोग होतो. गरनिर्मिती
मिळवली बाजारपेठ आइस्क्रीम, सीताफळ रबडी, शेक व विविध खाद्यपदार्थांत पल्पचा उपयोग होतो. विदर्भात अनेक आइस्क्रीम व्यावसायिक, केटरर्स आहेत. त्यांना पल्पचा नमुना देण्यात आला. त्यांच्याकडून मागणी वाढत गेली. कोरोनातील दोन वर्षांचा अपवाद वगळता अन्य वेळी बाजारपेठेत मागणी चांगली राहिली. मागणी, ‘क्वांटिटी’, पॅकिंग व वाहतूक यानुसार किलोला १६० रुपये ते २२५ रुपये दर मिळतो. लागवडीतील प्रयोग नव्या वाणाची लागवड
प्रयोगशीलतेचा गौरव सुसूत्रता आणि नियोजनबद्ध यांच्या बळावर शेती क्षेत्रात बोथरा यांनी ओळख तयार केली आहे. त्यात विनय शेतीतील प्रयोगांसह ‘मार्केटिंग’ची जबाबदारी सांभाळतात. तर बंधू तिलोक यांच्याकडे बाग व्यवस्थापनाची सूत्रे आहेत. सीताफळ महासंघाचे श्याम गट्टाणी, सचिव अनिल बोंडे, जयवंतराव महल्ले यांचे शेतीत मार्गदर्शन लाभते. यापूर्वी शेतीनिष्ठ पुरस्काराने बोथरा यांना गौरविण्यात आले आहे. संपर्क ः विनय बोथरा, ९८२३०३६९०१
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.