ग्रामीण भागातील जैवविविधतेच्या संवर्धनामध्ये पाच वर्षांपासून ‘सोसायटी फॉर एन्व्हायर्न्मेंटल ॲण्ड बायोडायव्हर्सिटी काँझर्व्हेशन’ (एसईबीसी) ही संस्था कार्यरत आहे. विशेषतः पश्चिम घाट परिसरात दुर्मीळ होणाऱ्या उपयुक्त वनस्पती, औषधी वनस्पती, कंदमुळांच्या संवर्धनासाठी संस्थेने लोकांच्या सहभागातून विविध उपक्रमांना चालना दिली आहे. पश्चिम घाट म्हणजेच सह्याद्री रांगांमध्ये आढळणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रजातींमुळे युनेस्कोने या भागातील ३९ नैसर्गिक भूप्रदेश जागतिक वारसा स्थळ म्हणून निवडले आहे. परंतु मानवी हस्तक्षेपामुळे बऱ्याच भागातील जंगल परिसंस्था धोक्यात आली आहे. या भागातील जंगलांचे संवर्धन व्हावे यासाठी ‘सोसायटी फॉर एन्व्हायर्न्मेंटल ॲण्ड बायोडायव्हर्सिटी काँझर्व्हेशन'' या स्वयंसेवी संस्थेची स्थापना झाली. संस्थेने २०१५ पासून पश्चिम घाटातील विविध भागांत देशी वृक्षांच्या लागवडीच्या माध्यमातून वृक्षारोपण आणि संवर्धन उपक्रम हाती घेतला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विक्रांत बेर्डे तसेच डॉ. राजेंद्र शेवडे, डॉ. राहुल मराठे, डॉ. दिग्विजय लवटे, डॉ. काशिनाथ चव्हाण, डॉ. चंदा बेर्डे, नचिकेत शेटे, दीपक रामाने या सदस्यांनी संस्थेच्या उपक्रमांना चालना दिली आहे. जंगल परिसरात असलेल्या गावातील लोकांना संस्थेने रोपवाटिका तयार करणे, बिया गोळा करणे आणि रोप लागवडीमध्ये सहभागी करून घेतले आहे. गेल्या पाच वर्षांत खासगी व सरकारी जागेमध्ये शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने ४५ वृक्षांच्या प्रजातींच्या विविध रोपांची लागवड संस्थेच्या माध्यमातून झाली आहे. लागवडीसाठी हिरडा, बेहडा, आवळा, जांभूळ, कोकम, चिंच, असाणा, अंजनी, कुंभा, मुरुडशेंग, पाडळ, पांढरा कुडा, काळाकुडा, साग, सीता अशोक, करंज, शिवण, सोनचाफा, बिब्बा, काजू, आंबा, गुंज, अडुळसा, बेल, खैर, समुद्राशोक, चारोळी, पळस, फणस, करवंद, उंडी, वारस, सुरंगी, चेर, वावडिंग, इ. वनस्पतींची निवड करण्यात आली. वनस्पतींची निवड करताना त्यांचा औद्योगिक उपयोगी, औषधी उपयोग, जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयुक्तता लक्षात घेतली आहे. देवराई संवर्धन उपक्रम पश्चिम घाट आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जंगल परिस्थिती चांगली आहे. या परिसरात ८४० देवराईंची नोंद झाली आहे. त्यामध्ये असलेल्या दुर्मीळ वृक्षांच्या प्रजाती, प्राणी आणि देवरायांबाबत जागरूकता करण्यासाठी ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालय, आठवडा बाजाराच्या ठिकाणी प्रचार केला जातो. पश्चिम घाट आणि त्यातील जैव विविधता याचे महत्त्व सांगण्यासाठी पथनाट्य, स्लाइड शो, प्रदर्शन, रॅलीचे आयोजन केले जाते. लांजा, दापोली परिसरांतील महाविद्यालयामध्ये औषधी वनस्पती व देशी वृक्षांच्या बियांचे प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. दाजिपूर परिसरातील जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांना विविध उपक्रमात सहभागी करून घेतले आहे. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी अळिंबी लागवड, गांडूळ खतनिर्मिती, स्ट्रॉबेरी लागवड, मधमाश्या पालनाबाबत प्रशिक्षण आणि तांत्रिक मार्गदर्शन केले जाते. देवरुखमधील सप्रे महाविद्यालय, दापोली येथील महाविद्यालय तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील वलवण ग्रामपंचायत, माळेवाडी, पनोरीमधील विद्यार्थी, प्राध्यापक, संस्थाचालक आणि शेतकऱ्यांची विविध उपक्रमांना मदत मिळाली आहे. रोजगारासाठी प्रशिक्षणाचे आयोजन
पुणे शहरातील उपक्रम
विद्यार्थांनी तयार केली रोपवाटिका
अपारंपरिक ऊर्जास्रोत वाढीसाठी प्रयत्न
संपर्क - डॉ. श्रीनाथ कवडे, ९७३०१५६८६५ (लेखक सोसायटी फॉर एन्व्हायर्न्मेंटल ॲण्ड बायोडायव्हर्सिटी काँझर्व्हेशन या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.