Watermelon Maturity Signs Agrowon
वेब स्टोरीज

Watermelon Harvesting: कलिंगडची काढणी करण्याची योग्य वेळ कोणती?

Summer Watermelon Care: उन्हाळ्यात कलिंगडाला बाजारात मोठी मागणी असते, पण योग्य काळजी न घेतल्यास फळांचा दर्जा कमी होऊ शकतो. त्यामुळे पाणी व्यवस्थापन, खतांचा वापर आणि पक्वतेची लक्षणे ओळखणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे.

Swarali Pawar
Watermelon Maturity Signs

योग्य वेळी काढणी

उन्हाळ्यात कलिंगडाला बाजारात चांगली मागणी असते. पण गोड आणि दर्जेदार फळ मिळवण्यासाठी योग्य काळजी आणि वेळेवर काढणी खूप महत्त्वाची असते.

Watermelon Maturity Signs

फळधारणेनंतरची काळजी

फळ लागल्यानंतर पाण्याचा ताण येऊ देऊ नका, पण जास्त पाणीही देऊ नका.
पोटॅशयुक्त खतांचा वापर केल्यास फळाची गोडी आणि वजन वाढते.

Watermelon Maturity Signs

काढणीपूर्वी पाण्याचा ताण

काढणीच्या काही दिवस आधी पाणी थोडे कमी दिल्यास गोडी वाढते. यामुळे फळाचा दर्जा सुधारतो आणि बाजारभाव चांगला मिळतो.

Watermelon Maturity Signs

उन्हापासून संरक्षण कसे कराल?

एप्रिल-मे महिन्यात कडक उन्हामुळे फळांवर डाग पडू शकतात. फळांवर पेंढे, गवत किंवा पानांचे आच्छादन करून त्यांना वाचवा.

Watermelon Maturity Signs

पक्वतेची पहिली खूण

फळाच्या देठाजवळील बाळी पूर्ण सुकलेली दिसली तर फळ तयार झालेले असते. देठ हिरवा न राहता तपकिरीसर झाला तरी काढणीची वेळ समजा.

Watermelon Maturity Signs

आवाजावरून ओळखा

पिकलेल्या कलिंगडावर हलके ठोकल्यास मंद, भरलेला ‘बद’ आवाज येतो. कच्च्या फळावर ठोकल्यास तीक्ष्ण, धातूसारखा आवाज ऐकू येतो.

Watermelon Maturity Signs

रंग आणि सालीवरून ओळख

जमिनीला लागलेला भाग पांढरा न राहता पिवळसर झाला तर फळ तयार आहे. पिकलेल्या फळाची साल थोडी खडबडीत वाटते, तर कच्ची गुळगुळीत असते.

Watermelon Maturity Signs

काढणी आणि बाजारासाठी टिप्स

फळे धारदार सुरीने सकाळी कापून घ्या आणि सावलीत ठेवा. वाहतुकीत पेंढ्याचा थर द्या आणि आकारानुसार प्रतवारी करूनच बाजारात पाठवा

Cucumber Benefits: उन्हाळी आहारात काकडीचा समावेश का करावा? जाणून घ्या कारणं!

Shaktipeeth Expressway: शेतकऱ्यांच्या संसारावर वरवंटा फिरवणारा शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही- राजू शेट्टी

Superintendent Agriculture Officer: लातूरच्या ‘एसएओ’पदी राजेंद्र कदम यांची नियुक्ती

Road Project: मोहोळ-तांदूळवाडी मार्ग मंजुरीच्या अंतिम टप्प्यात

Political Controversy: गाळे बांधकामाबाबतीत आरोप राजकीय हेतूने प्रेरित

Maharashtra Farmer Issues: पीक विमा, अतिवृष्टी सरकारसाठी अडचणीचे

SCROLL FOR NEXT