Cucumber Benefits: उन्हाळी आहारात काकडीचा समावेश का करावा? जाणून घ्या कारणं!

Swarali Pawar

काकडी खा, कुल रहा!

उन्हाळा लागला की अंगातून घाम धाराधार वाहतो आणि सतत पाणी प्यायची गरज वाटते. अशा वेळी आपल्या महाराष्ट्रात सहज मिळणारी काकडी शरीरासाठी खूपच उपयोगी ठरते.

Cucumber Benefits | Agrowon

नैसर्गिक थंडावा

काकडीत जवळपास ९५% पाणी असतं, म्हणून ती खाल्ली की अंगात गारवा येतो. लिंबू-मीठ टाकून काकडी खाल्ली तर उन्हाचा त्रास लगेच कमी झाल्यासारखं वाटतं.

Natural Coldness | Agrowon

डिहायड्रेशनपासून बचाव

उन्हात बाहेर काम करताना शरीरातील पाणी कमी होतं. काकडी खाल्ल्याने पाण्याची कमतरता भरून निघते आणि शरीर ताजंतवानं राहतं.

Avoid Dehydration | Agrowon

पचनासाठी फायदेशीर

गावाकडं जेवणात काकडीची कोशिंबीर असतेच, कारण ती पचन सुधारते. फायबरमुळे बद्धकोष्ठता कमी होते आणि पोट हलकं राहतं.

Beneficial for Gut health | Agrowon

वजन नियंत्रणात मदत

काकडीत कॅलरीज खूप कमी असतात. मधल्या वेळेला भूक लागली तर चिप्सऐवजी काकडी खाल्ली तर वजन वाढत नाही.

Help in Weight Loss | Agrowon

त्वचेसाठी उत्तम

उन्हामुळे त्वचा कोरडी पडते आणि काळवंडते. काकडी खाल्ल्याने तसेच चेहऱ्यावर लावल्याने त्वचा ताजी आणि गार राहते.

Best for Skin | Agrowon

रक्तदाब नियंत्रणात मदत

काकडीत पोटॅशियम असतं, जे रक्तदाब संतुलित ठेवायला मदत करतं. म्हणून ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांनी आहारात काकडी जरूर ठेवावी.

Helps in Blood Pressure | Agrowon

काकडी कशी खायची?

सॅलडमध्ये, ताकात, रायत्यात किंवा सरळ मीठ-मिरची टाकून खा. दररोज थोडी काकडी खा आणि या उन्हाळ्यात स्वतःला ठेवा एकदम “कूल”!

How to eat | Agrowon

Tomato Fruit Borer: टोमॅटोवरील फळ पोखरणारी अळी रोखण्यासाठी सोपे उपाय

Agrowon
अधिक माहितीसाठी..