Maharashtra Rainfall Forecast: ‘अर्णब’ पाठोपाठ बंगालच्या उपसागरात आज (ता. १) नव्याने चक्रीवादळ घोंघावण्याचा अंदाज आहे. या वादळी प्रणालीमुळे विदर्भात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..पावसाळी वातावरणामुळे राज्यातील कमाल तापमानात घट झाली आहे. शनिवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये डहाणू येथे राज्यातील उच्चांकी ३५.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जेऊर आणि सोलापूर येथे ३५ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. तर धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १६.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले..Rain Forecast: मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज.कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. शनिवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील चास येथे सर्वाधिक २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यातील इंदापूर, जुन्नर, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि मुंबईतील सांताक्रूझ येथे १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली..आज (ता. १) पूर्व विदर्भातील यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे..Maharashtra Rain Forecast: पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता.उपसागरात पुन्हा चक्रीवादळाचे संकेत‘अर्णब’ चक्रीवादळ निवळल्यानंतर उत्तर प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. दक्षिण अंदमान समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत असून, आज (ता. १) या भागात पुन्हा चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज आहे. उद्यापर्यंत (ता. २) ही प्रणाली आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ येणार आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात चक्राकार वारे वाहत असून, तेथून कर्नाटक आणि केरळ किनाऱ्यालगतच्या आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे..विजांसह वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :यवतमाळ, नागपूर,भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.विजांसह पावसाची शक्यतासिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, नांदेड.उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे (तापमान अंश सेल्सिअसमध्ये) डहाणू ३५.७, जेऊर ३५.५, सोलापूर ३५.४..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.