Maharashtra Winter Season: राज्याच्या तापमानात चढ-उतार होत होत आहे. थंडी कमी झाली असून, दुपारच्या वेळी उकाडा जाणवत आहे. आजपासून (ता. २६) विदर्भाच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच राहणार आहेत..उत्तर महाराष्ट्र आणि कोकण परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळून गेली आहे. राज्यात ढगाळ हवामान होत किमान तापमानात घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे. तर उर्वरित राज्यात उकाडा वाढला आहे..बुधवारी (ता. २५) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ११.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात १२.४ अंश, नागपूर येथे १३.२ आणि यवतमाळ येथे १४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान १५ अंशांच्या वर होते..Weather Update: किमान तापमानात वाढ; थंडी झाली कमी.राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच असून, बुधवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ आणि सोलापूर येथे कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पार आहे. राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान ३० अंशांच्या पुढेच आहे. आजपासून (ता. २६) विदर्भाच्या किमान तापमानात घट होण्याची तर उर्वरित राज्याच्या तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..बुधवारी (ता. २५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये)ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३१.३---१५.७अहिल्यानगर---३१.८---२१.३धुळे---३१.०---११.६जळगाव---३१.६---१४.८जेऊर---३३.०---१७.५कोल्हापूर---३१.८---२१.०महाबळेश्वर---२४.५---१६.५नाशिक---३१.३---१४.२.Maharashtra Weather: राज्यात किमान तापमानात वाढ; उकाड्यातही झाली वाढ .निफाड---३१.९---१२.४सांगली---३२.९---२१.५सातारा---३३.३---१८.१सोलापूर---३५.१---२१.७सांताक्रूझ---३५.७---२१.६डहाणू---३४.३---१९.०रत्नागिरी---३६.४---२२.०छत्रपती संभाजीनगर---३२.५---१६.८.धाराशिव---३१.१---१६.९परभणी---३२.४---१८.०परभणी (कृषी)---३१.६---१६.२अकोला---३३.६---१८.५अमरावती---३३.४---१७.५ब्रह्मपुरी---३०.५---१८.४बुलडाणा---३०.०---१७.५.चंद्रपूर---३४.२---१९.६गडचिरोली---३१.६---१८.०गोंदिया---३०.२---१४.२नागपूर---३१.२---१३.२वर्धा---३२.५---१५.९वाशीम---३१.२---१७.२यवतमाळ---३१.२---१४.०.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---११.६---३१.९पश्चिम महाराष्ट्र---१५.७---३५.१कोकण---१९.०---३६.४मराठवाडा---१६.२---३२.५विदर्भ---१३.२---३४.२राज्यात गारठा वाढलेली ठिकाणे (तापमान अंश सेल्सिअसमध्ये) : धुळे ११.६, निफाड १२.४, नागपूर १३.२, यवतमाळ १४..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.