Heatwave Conditions in Vidarbha: विदर्भातील उष्णतेची लाट कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सोमवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे हंगामातील उच्चांकी ४७.२ तापमानाची नोंद झाली. तसेच वर्धा उष्ण रात्र अनुभवायाला मिळत आहे. आज (ता. २६) विदर्भात दिवसासह रात्रदेखील उष्ण ठरण्याची शक्यता असून, अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत तीव्र उष्ण लाटेमुळे खबरदारीचा इशारा (रेड अलर्ट) कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे..सोमवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये महाराष्ट्रातील ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दक्षिण बिहारपासून आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापर्यंत, तसेच पंजाबपासून अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचे पट्टे आहेत. तर आग्नेय अरबी समुद्रापासून कोमोरिन भाग, मन्नारचे आखात, दक्षिण तामिळनाडू ते नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे..सोमवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत ब्रह्मपुरी पाठोपाठ चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गडचिरोली, अमरावती आणि गोंदिया येथे ४५ अंशांपेक्षा अधिक, भंडारा येथे ४४ अंश, तसेच अकोला आणि वाशीम येथे ४३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. तापमानाचा पारा ४० पार गेल्यास आणि कमाल तापमानात ४.५ अंशापेक्षा अधिक वाढ झाल्यास, तसेच कमाल तापमान ४५ अंशांपार गेल्यास उष्णतेची लाट आल्याचे समजले जाते. तर रात्रीच्या किमान तापमानात ४.५ अंशांची वाढ झाल्यास उष्ण रात्र समजली जाते. यातच महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली..Vidarbha Heat Wave: मराठवाड्यात पाऊस, विदर्भात उष्णतेचा इशारा; मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज.आज (ता. २६) विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत तीव्र उष्ण लाटेची शक्यता असल्याने खबरदारीचा इशारा (रेड अलर्ट) कायम आहे. अकोला, नागपूर जिल्ह्यांत उष्ण लाटेची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. पालघर, ठाणे, मुंबई येथे उष्ण व दमट हवामान, यवतमाळ, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत उष्ण लाटेचा, तर रायगड, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे..मॉन्सून जैसे थेशनिवारी (ता. २३) मॉन्सूनने श्रीलंकेचा निम्म्याहून अधिक भाग, नैर्ऋत्य अरबी समुद्राचा काही भाग, आग्नेय अरबी समुद्राचा आणखी काही भाग, कोमोरिन, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागासह, अंदमान समुद्राचा बहुतांश भाग व्यापला आहे. सोमवारी (ता.२५) मॉन्सूनची वाटचाल जैसे थे होती. येत्या दोन दिवसांत अरबी समुद्र, कोमोरिन भाग, बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, संपूर्ण अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे..सोमवारी (ता. २५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३४.९---२४.२अहिल्यानगर---निरंक---२५.६धुळे---४०.८---२५.५जळगाव---४१.५---२८.०जेऊर---४०.५---२१कोल्हापूर---३२.०--२४.४महाबळेश्वर---२५.२---१९.मालेगाव---४०.२---२१.४नाशिक---३६---२५.१निफाड---३७.९---२५.९सांगली---३५---२३.५सातारा---३४.५---२३.७सोलापूर---३९.८---२६.६सांताक्रूझ---३४.८---२९.४डहाणू---३६.८---२८.३रत्नागिरी---३२.६---२६.५.Heat Wave Alert: विदर्भात उष्ण लाटेचा इशारा.छत्रपती संभाजीनगर---४०.८---२७धाराशिव---४०.७---२३.४परभणी---४०.१---२७.६परभणी (कृषी)---४०.४---निरंकअकोला---४३.४---३१.५अमरावती---४५.२---२८.५भंडारा---४४.८---२५बुलडाणा---४०.६---२७.३ब्रह्मपूरी---४७.२---२८.८.चंद्रपूर---४५.६---३१.२गडचिरोली---४५.२---३०.४गोंदिया---४५---२७.५नागपूर---४५.४---२८.६वर्धा---४५.५---३२.२वाशीम---४३.४---२७.६यवतमाळ---४२.८---३०.४.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---२१.४---४१.५पश्चिम महाराष्ट्र---१९.०---४०.५मराठवाडा---२३.४---४०.७विदर्भ---२५.०---४७.२कोकण---२६.४---३६.८.उष्ण लाटेचा इशारा (रेड अलर्ट) : अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली.उष्ण लाटेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : अकोला, नागपूर.उष्ण लाट व उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) : पालघर, ठाणे, मुंबई, यवतमाळ, भंडारा, गोंदिया.वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : रायगड, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड.उष्णतेची लाट असलेली ठिकाणे : ब्रह्मपुरी ४७.२, चंद्रपूर ४५.६, वर्धा ४५.५, नागपूर ४५.४, गडचिरोली ४५.२, अमरावती ४५.२, गोंदिया ४५..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.