Monsoon Update: पश्चिम महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आता पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र विदर्भात पावसाचा जोर अधिक वाढला आहे. गुरुवारी (ता. ३०) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत विदर्भात पावसाचा जोर लक्षणीय वाढला असून गोंदिया जिल्ह्यातील पेंढरी मंडळात सर्वाधिक २२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत अतिवृष्टीचा विस्तार वाढल्याने राज्यात एकूण १२६ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. .या पावसामुळे भातासह खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला असून नद्या, नाले आणि लघु प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे..Maharashtra Rain Alert: कोकण-घाटमाथ्यावर जोरदार.कोकण व पश्चिम महाराष्ट्रात मागील काही दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर कमी झाला असला तरी प्रमुख धरणांतील साठा समाधानकारक पातळीवर कायम आहे. मागील दहा ते बारा दिवसांत कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात सातत्याने मुसळधार पाऊस पडल्यामुळे बहुतांश मोठी धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. पुणे विभागातील खडकवासला धरण शंभर टक्के भरले असून चासकमान, पानशेत, वीर आणि पवना ही धरणेही पूर्ण क्षमतेच्या जवळ पोहोचली आहेत. उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा जवळपास पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचला असून कोयना धरणातही सुमारे ८० टक्के साठा उपलब्ध आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी सिंचनाची चिंता बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. राज्यातील बहुतांश मोठ्या धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा निर्माण झाल्याने आगामी हंगामासाठी पाण्याची उपलब्धता चांगली झाली आहे. मात्र विदर्भातील काही नद्यांमध्ये पाणीपातळी वाढल्याने नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याची आवश्यकता प्रशासनाने व्यक्त केली आहे..कोकणात विश्रांतीकोकणात गेल्या आठवडाभरातील मुसळधार पावसानंतर आता पावसाचा जोर कमी झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, माडखोल ६६ मिमी आणि भुईबावडा येथे ६५ मिमी पावसाची नोंद झाली. सततच्या पावसानंतर आता मध्यम स्वरूपाच्या सरी पडत असल्याने भात लागवडीला पोषक वातावरण निर्माण झाले असून पाण्याचा निचरा होण्यासही मदत होत आहे. नद्यांमधील पूरस्थिती हळूहळू आटोक्यात येत असून शेतकऱ्यांना शेतीतील मशागतीची कामे पुन्हा सुरू करण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. फळबागा आणि भाजीपाला पिकांनाही या विश्रांतीचा फायदा होत असून जमिनीतील ओलावा समाधानकारक कायम आहे..Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात.मध्य महाराष्ट्रात हलक्या सरीमध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर अधूनमधून पाऊस सुरू असला तरी मागील काही दिवसांच्या तुलनेत तीव्रता कमी झाली आहे. सातारा जिल्ह्यातील मोरगिरी ९१ मिमी येथे सर्वाधिक पाऊस झाला, तर कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा ६५ मिमी येथे अतिवृष्टीची नोंद झाली. धरणक्षेत्रात अद्यापही पाण्याची आवक सुरू असल्याने कृष्णा व भीमा खोऱ्यातील जलसाठा मोठ्या प्रमाणात झाला आहे. ऊस, सोयाबीन, मका आणि भात पिकांच्या वाढीस हा पाऊस पोषक ठरत आहे. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना आंतरमशागत, खत व्यवस्थापन आणि तण नियंत्रणाची कामे गतीने करता येत असून अनेक भागांत शेतीची कामे पुन्हा वेगाने सुरू झाली आहेत..मराठवाड्याला दिलासामराठवाड्यात यंदाच्या हंगामात सुरुवातीच्या खंडानंतर पावसात सुधारणा होत आहे. नांदेड जिल्ह्यातील मुगट ९२ मिमी, मुदखेड ८० मिमी आणि उमरी बाजार ६६ मिमी येथे अतिवृष्टीची नोंद झाली. जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा ६८ टक्क्यांहून अधिक झाल्याने परिसरातील खरीप पिकांना तसेच आगामी रब्बी हंगामालाही मोठा आधार मिळणार आहे. सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांच्या वाढीस या पावसाचा फायदा होत आहे. अनेक भागांत पिकांची वाढ जोमात सुरू असून जलसाठ्यात झालेली वाढ पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनासाठीही महत्त्वाची ठरणार आहे..विदर्भात तांडवराज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद यावेळी विदर्भात झाली. गोंदिया जिल्ह्यातील पेंढरी २२२ मिमी मंडळ राज्यात अव्वल ठरले. त्यापाठोपाठ बल्लारपूर १७८ मिमी, मुळचेरा १७५, अहेरी १६५, खामनचेरू व लगाम १६३, आलापल्ली १६२, मुरूमगाव १६०, धाबा १५८, एटापल्ली १५५, ब्राह्मणी व चाटगाव १५३, काकोडी १५२ अशा अनेक मंडळांत मुसळधार पाऊस झाला..गुरूवार (ता.३०) सकाळी आठ वाजेपर्यंतझालेला मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)कोकण : आंबोली, माडखोल ६६, भुईबावडा ६५.मध्य महाराष्ट्र : मोरगिरी ९१, गगनबावडा ६५.मराठवाडा : मुगट ९२, मुदखेड ८०, उमरी बाजार ६६.(स्त्रोत : कृषी विभाग).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.