IMD Weather Update: उन्हाच्या चटक्यामुळे होरपळणाऱ्या विदर्भाला काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. आजपासून (ता. २९) विदर्भात पूर्वमोसमी पावसाच्या सरी थंडावा देण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..मंगळवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर प्रदेशातील बांदा येथे देशातील उच्चांकी ४७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्र आणि परिसरावर केंद्राकडून बाहेरच्या दिशेने वाहणारी चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तेलंगणा आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, त्यापासून कोमोरीन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे..मंगळवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अमरावती येथे राज्यातील उच्चांकी ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला, वर्धा येथे ४६ अंश, यवतमाळ, नागपूर आणि चंद्रपूर येथे ४५ अंश व त्यापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. तर धुळे, जळगाव, परभणी, वाशीम येथे ४४ अंशापेक्षा अधिक तापमान नोंदले गेले. धुळे येथील कृषी महाविद्यालय आणि महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी २१.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली..Maharashtra Weather Update: विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज.आज (ता. २९) उन्हाच्या चटका वाढला असतानाच, विदर्भात पूर्वमोसमी वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. २९) बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे..मंगळवारी (ता. २८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३९.८---२४.४धुळे---४४.०---२०.४जळगाव---४४.६---२६.२जेऊर---४२.०---२१.०कोल्हापूर---३६.३--२४.१महाबळेश्वर---३२.५---२१.३मालेगाव---४२.६---२५.०नाशिक---३९.८---२३.७.Summer Heatwave Record: अमरावती, वर्धा, यवतमाळमध्ये एप्रिलमधील उच्चांक.निफाड---४१.९---२१.०सांगली---३९.४---२४.२सातारा---४१.२---२४.०सोलापूर---४३.९---२८.०सांताक्रूझ---३४.३---२५.६डहाणू---३६.८---२४.९रत्नागिरी---३३.५---२६.६छत्रपती संभाजीनगर---४३.०---२८.५.धाराशिव---४१.८---२५.२परभणी---४४.५---२७.९परभणी (कृषी)---४३.६---२३.५अकोला---४६.३---३०.५अमरावती---४६.६---२६.३भंडारा---४२.०---२७.०बुलडाणा---४३.६---२९.०.ब्रह्मपुरी---४३.४---२८.४चंद्रपूर---४५.२---३०.०गडचिरोली---४३.२---२७.४गोंदिया---४१.०---२५.२नागपूर---४५.०---२८.०वर्धा---४६.५---२९.०वाशीम---४४.४---२७.४यवतमाळ---४५.२---३०.०.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---२०.४---४४.६पश्चिम महाराष्ट्र---२१.०---४३.९मराठवाडा---२३.५---४४.५विदर्भ---२५.२---४६.६कोकण---२४.९---३४.३.वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :अमरावती ४६.६, वर्धा ४६.५, अकोला ४६.३, चंद्रपूर ४५.२, यवतमाळ ४५.२, नागपूर ४५..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.