Heatwave Red Alert: विदर्भात तीव्र लाटेचा ‘रेड अलर्ट’
IMD Weather Update: विदर्भात गेल्या काही दिवसांपासून उष्ण लाटेमुळे होरपळ वाढली आहे. उर्वरित राज्यातही उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत. आज (ता. २८) वाशीम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याने खबरदारीचा इशारा (रेड अलर्ट) कायम आहे.