Maharashtra Weather Update: राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. मागील ३ दिवस अनेक भागात उष्णतेची लाट होती. पुढील ५ दिवसांमध्ये राज्यातील काही भागात उष्णतेची लाट तर काही भागात पावसाला पोषक हवामान असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. .राज्यात उन्हाचा चटका असह्य होत आहे. विदर्भातील सर्वच भागात तापमान ४२ अंशाच्या पुढे सरकले आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे..Maharashtra Weather Update: विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज.हवामान विभागाने आज वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. तर सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला होता. .Vidarbha Weather Update: होरपळणाऱ्या विदर्भाला मिळणार ‘थंडावा’.गुरुवारी आणि शुक्रवारी काही भागात अंशतः ढगाळ हवामान राहून तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे. तर शनिवारी यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे..रविवारीही यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. राज्याच्या इतर भागात तापमान कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.