Maharashtra Heatwave Alert: एप्रिल महिना अखेरच्या टप्प्यात आला असताना, सूर्य आग ओकायला लागला आहे. उन्हाचा ताप प्रचंड वाढल्याने राज्यात विक्रमी तापमानाची नोंद होत आहे. रविवारी (ता. २६) अमरावती, वर्धा आणि यवतमाळमध्ये एप्रिल महिन्यातील आतापर्यंतच्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे..राज्यात उन्हाचा झळा असह्य होत आहेत. यातच विदर्भात उन्हाचा चटका अधिक तापदायक ठरत आहे. एप्रिल महिन्यातील तापमानाचे नवे उच्चांक नोंदले जात आहेत. हवामान विभागाकडून देशभरातील विविध ठिकाणच्या प्रत्येक महिन्यातील तापमानाच्या नोंदी घेतल्या जातात. त्यानुसार अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या ठिकाणी एप्रिल महिन्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाल्याचे स्पष्ट झाले आहे..Maharashtra Rain Alert: राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ३ दिवस पावसाचा अंदाज.हवामान विभागाकडील नोंदीनुसार, रविवारी (ता. २६) अमरावती येथे एप्रिल महिन्यातील आतापर्यंतच्या उच्चांकी ४६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अमरावती येथील १८९२ पासूनच्या नोंदीनुसार, २७ एप्रिल २०१९ मध्ये उच्चांकी ४६.८ तापमानाची नोंद झाली होती..Weekly Weather: तापमान वाढीसह ढगाळ हवामानाची शक्यता.वर्धा येथे एप्रिल महिन्यातील आतापर्यंतच्या उच्चांकी ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वर्धा येथील १९६६ पासूनच्या नोंदीनुसार, २६ एप्रिल १९७३ मध्ये उच्चांकी ४६.२ तापमानाची नोंद झाली होती. यवतमाळ येथील १९५१ पासूनच्या नोंदीनुसार, एप्रिल महिन्यातील उच्चांकी ४६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. यापूर्वी ३० एप्रिल २०१९ रोजी ४५.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते..दरम्यान, रविवारी (ता. २६) अकोला येथे राज्यातील यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४६.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. एप्रिल महिन्यातील अकोल्याचे हे आतापर्यंतचे चौथ्या क्रमांकाचे उच्चांकी तापमान ठरले आहे. यापूर्वी २३ एप्रिल २०१९ रोजी एप्रिल महिन्यातील सर्वाधिक ४७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.