Pune News: राज्यात मागील २ दिवसांपासून अनेक भागात पाऊस हजेरी लावत आहे. कालपासून मात्र पावसाचा जोर वाढला. आज दुपारपर्यंत राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यात पावसाचा अंदाज दिला. त्यातही आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता आहे. .हवामान विभागाने आज राज्यभरात जोरदार पावसाचा अंदाज दिला. त्यातही रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. रत्नागिरी, ठाणे, पालघर, मुंबई, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्पापूर, सातारा, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला..Heavy Rain Alert : राज्यात आज पाऊस दणका देणार ; कोकण, घाटमाथ्यावर ऑरेंज तर राज्यभरात येलो अलर्ट.उद्या कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला. तसेच पुणे, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उद्या ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला..Return Monsoon : मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू.बुधवारी कोकणातील रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्यात आणि विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. .तर राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामा नविभागाने दिला. गुरुवारी खानदेशातील तिन्ही जिल्हे, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार तर इतर भागात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला. विदर्भात मात्र उघडीप राहण्याची शक्यता आहे. शुक्रवारीही कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.