Pune News: राज्यात अंशतः ढगाळ हवामान झाल्याने गारठा कमी होत उकाड्यात वाढ झाली आहे. यातच पावसाला पोषक हवामान झाल्याने आज (ता. २) उत्तर महाराष्ट्रात जोरदार वारे, विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे..उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी झाला असून, रविवारी (ता. १) पंजाबच्या अमृतसर येथे देशाच्या सपाट भुभागावरील नीचांकी ५.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये कर्नाटक कारवार येथे देशातील उच्चांकी ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीप आणि केरळच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत..रविवारी (ता. १) धुळे येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी धुळे १०.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३३.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात दिवसभर अंशतः ढगाळ हवामान असल्याने वातावरण धूसर झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे..Rain Update: राज्यात पावसाला पोषक हवामान; पाच जिल्ह्यात पावसाचा इशारा.आज (ता. २) राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यांत जोरदार वारे, विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, अहिल्यानगर विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे..शनिवारी (ता. ३१) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३०.५---१४.९अहिल्यानगर---३०.१---निरंकधुळे---३१.०---१०.५जळगाव---३१.१---१७.०जेऊर---३१.०---१२.५कोल्हापूर---३०.०--१७.६.महाबळेश्वर---२४.०---१४.४मालेगाव---३०.०---१२.८नाशिक---३०.३---१५.६निफाड---२९.८---१३.४सांगली---३१.०---१७.९सातारा---३०.८---१३.५सोलापूर---३२.२---१९.५सांताक्रूझ---२९.५---२१.०.Weekly Weather: किमान, कमाल तापमानात अल्पशी वाढ शक्य .डहाणू---२८.८---१९.२रत्नागिरी---३३.०---२०.०छत्रपती संभाजीनगर---२९.४---१५.८धारशिव---३०.६---१२.८परभणी---३१.२---१५.१परभणी (कृषी)---२९.९---१२.९अकोला---३२.०---१८.०.अमरावती---३१.८---१४.९भंडारा---३०.०---१५.०बुलडाणा---३०.०---१७.५ब्रह्मपुरी---३३.४---१५.२चंद्रपूर---३२.८---१६.८गडचिरोली---३०.६---१५.६गोंदिया---३०.०---१३.२नागपूर---३१.०---१३.४वर्धा---३१.५---१५.२वाशीम---३०.०---१५.४यवतमाळ---३१.२---११.८.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---१०.५---३१.१पश्चिम महाराष्ट्र---१२.५---३२.२मराठवाडा---१२.९---३१.२विदर्भ---१३.२---३३.४कोकण---१९.२---३३.०.वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : धुळे, जळगाव, नाशिक.विजांसह पावसाची शक्यता : नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, अहिल्यानगर..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.