Maharashtra Weather Update: राज्यात पावसाला पोषक हवामान होताच उष्णतेची लाट काहीशी ओसरली आहे. मात्र उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे. आज (ता. १८) राज्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता आहे..मराठवाड्यापासून मनारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मंगळवारी (ता. १७) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये वाशीम येथे देशातील उच्चांकी ४०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील उष्णतेची लाट काहीशी कमी झाली असून मंगळवारी (ता. १७) वाशीम आणि जेऊर येथे ४० अंशांपेक्षा अधिक, अमरावती, वर्धा, ब्रह्मपुरी, सोलापूर येथे ३९ अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १०.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले..आज (ता. १८) कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, मेघगर्जना, विजांसह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका, उकाडा कायम राहून विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे..Pre Monsoon Rain: विदर्भात ४ दिवस पावसाचा अंदाज; राज्यभरात बुधवारी आणि गुरुवारी पूर्व मोसमी पावसाची शक्यता.मंगळवारी (ता. १७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३५.४---१६.०धुळे---३७.०---११.८जळगाव---३६.७---२०.५जेऊर---४०.०---१७.५कोल्हापूर---३५.८--२१.०महाबळेश्वर---२८.८---१६.४मालेगाव---३८.६---१६.४.नाशिक---३४.१---१४.६निफाड---३६.०---१०.६सांगली---३६.५---२१.२सातारा---३५.७---१७.०सोलापूर---३९.३---२३.६सांताक्रूझ---३१.७---२२.१डहाणू---३३.६---२०.१रत्नागिरी---३२.०---२२.०छत्रपती संभाजीनगर---३६.२---१९.८.Maharashtra Rain Forecast: राज्यात चार दिवस वादळी पावसाचा इशारा.धाराशिव---३८.८---२१.२परभणी---३८.४---२२.७परभणी (कृषी)---३७.३---१८.६अकोला---३८.९---२१.३अमरावती---३९.६---२०.३भंडारा---३७.०---२०.०बुलडाणा---३६.६---२२.६ब्रह्मपुरी---३९.४---२२.३चंद्रपूर---३७.८---२४.०.गडचिरोली---३८.४---२०.८गोंदिया---३६.४---२१.४नागपूर---३७.६---२१.०वर्धा---३९.६---२१.४वाशीम---४०.५---१९.४यवतमाळ---३८.४---२३.०.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---१०.६---३८.६पश्चिम महाराष्ट्र---१६.०---४०.०मराठवाडा---१८.६---३८.८विदर्भ---१९.४---४०.५कोकण---२०.१---३३.६.उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :वाशीम ४०.५, जेऊर ४०, अमरावती ३९.६, वर्धा ३९.६, ब्रह्मपुरी ३९.४, सोलापूर ३९.३.वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :रायगड, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.