Pune News: राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने अनेक भागांत ढगाळ हवामान होत आहे. यातच किमान तापमानात चढ - उतार सुरू आहेत. आज (ता. ३१) राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी-अधिक होत असून, शुक्रवारी (ता. ३०) मध्य प्रदेशच्या राजगढ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये केरळच्या कोची येथे देशातील उच्चांकी ३५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अरबी समुद्रात दक्षिण केरळच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत..शुक्रवारी (ता. ३०) धुळे येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी धुळे ८.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात धुक्यासह दव पडत असून दिवसभर वातावरण धुसर असल्याचे दिसून येत आहे. आज (ता. ३१) राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानात २ ते ४ अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाला पोषक वातावरण; राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाचा अंदाज.शुक्रवारी (ता. ३०) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३०.८---१८.२अहिल्यानगर---३०.८---१५.४धुळे---२७.०---८.५जळगाव---२७.६---१३.५जेऊर---३२.०---१३.०कोल्हापूर---३०.१--१८.९महाबळेश्वर---२५.९---१५.०.मालेगाव---२७.८---१५.०नाशिक---२८.५---१६.६निफाड---२८.४---१४.५सांगली---३१.३---१९.३सातारा---३०.४---१६.६सोलापूर---३३.१---२०.२सांताक्रूझ---३३.३---२२.०डहाणू---२८.६---१९.६.Maharashtra Weather Update: किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता.रत्नागिरी---३४.०---२०.२छत्रपती संभाजीनगर---२८.८---१६.२धाराशिव---३०.०---१६.०परभणी---३०.३---१६.४परभणी (कृषी)---२९.८---१३.५अकोला---३१.२---१६.५अमरावती---३१.८---१५.०भंडारा---३२.०---१५.०.बुलडाणा---२९.४---१६.४ब्रह्मपुरी---३२.२---१५.४चंद्रपूर---३०.६---१८.०गडचिरोली---२९.२---१५.२गोंदिया---२८.०---१४.८नागपूर---२८.८---१४.२वर्धा---२९.९---१४.८वाशीम---२९.८---१५.२यवतमाळ---२९.०---१७.८.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---८.५---३०.८पश्चिम महाराष्ट्र---१३.०---३३.१मराठवाडा---१३.५---३०.३विदर्भ---१४.२---३२.२कोकण---१९.६---३४.०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.