Weekly Weather: थंडीची तीव्रता कमी-अधिक राहण्याची शक्यता
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रावर आज (ता.४) १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. मात्र पूर्व विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांवर तो १०१६ हेप्टापास्कल इतका राहणे शक्य आहे. त्यानुसार भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत थंडीची तीव्रता अधिक, तर उर्वरित महाराष्ट्रात कमी राहील.