Pune News: राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब झाली आहे. तर कमाल तापमानाचा पारा तिशीपार गेल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. आज (ता. ५) राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानातील चढ-उतार, तसेच उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी-अधिक होत असून, बुधवारी (ता. ४) हरियानाच्या हिस्सार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. अरबी समुद्रात दक्षिण केरळ आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, दक्षिण केरळपासून दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे..Cloudy Weather Maharashtra: ढगाळ हवामानामुळे शेतकरी चिंतातुर.बुधवारी (ता. ४) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी धुळे १०.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३४.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात दिवसभर अंशतः ढगाळ हवामान असल्याने उकाडा वाढल्याचे चित्र आहे. आज (ता. ५) राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानातील चढ - उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..बुधवारी (ता. ४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३०.४---१४.९अहिल्यानगर---३०.०---१४.३धुळे---३१.४---१०.४जळगाव---३१.८---१५.३जेऊर---३१.५---१३.५कोल्हापूर---२९.७--१८.६.महाबळेश्वर---२६.०---१४.६मालेगाव---३०.८---१४.४नाशिक---३०.४---१५.४निफाड---२९.८---११.७सांगली---३१.२---१९.५सातारा---३१.२---१६.४सोलापूर---३२.८---२०.०.Maharashtra Weather: तापमानातील चढ-उतार कायम राहणार.सांताक्रूझ---३२.७---१९.६डहाणू---२७.९---१८.५रत्नागिरी---३४.७---२०.८छत्रपती संभाजीनगर---२९.६---१६.०धारशिव---३०.९---१४.६परभणी---३०.५---१६.२परभणी (कृषी)---३०.२---१३.०.अकोला---३२.७---१७.२अमरावती---३२.८---१६.४भंडारा---३०.०---१५.०बुलडाणा---३०.०---१७.५ब्रह्मपुरी---३३.८---१५.८चंद्रपूर---३१.६---१७.२.https://www.youtube.com/watch?v=gNSoVFpfA1Mगडचिरोली---३०.२---१५.४गोंदिया---३१.२---१४.४नागपूर---३०.८---१४.४वर्धा---३२.०---१५.४वाशीम---३१.०---१४.४यवतमाळ---३०.०---१५.४.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---१०.४---३१.८पश्चिम महाराष्ट्र---१३.५---३२.८मराठवाडा---१३.०---३०.९विदर्भ---१४.४---३३.८कोकण---१८.५---३४.७.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.