Maharashtra Rains : राज्यातील काही भागात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई शहर, मुंबई उपनगरांसह रायगड, ठाणे, पुणे जिल्ह्यांसाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे. तर नंदुरबार, जळगाव, भंडारा, रत्नागिरी, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईत शनिवारपासून जोरदार पाऊस सुरु आहे..२४ तासांत १० जणांचा मृत्यू पीटीआयच्या वृत्तानुसार, महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत पावसाशी संबंधित घटनांमध्ये किमान १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर पूरग्रस्त भागातून ११,८०० लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. नाशिकमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात घर कोसळलेल्या घटनेतील तिघांचा जणांचा समावेश आहे. तर धाराशिव आणि अहिल्यानगरमध्ये प्रत्येकी दोन आणि जालना आणि यवतमाळमध्ये प्रत्येकी एका मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे..Rain Alert Maharashtra : कोकण, घाटमाथ्यावर विजांसह पावसाचा अंदाज.पालघरमध्ये शाळांना सुट्टीपालघरमध्ये खबरदारी म्हणून सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज (दि. २९ सप्टेंबर) सुट्टी देण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील तलासरी येथे अतिवृष्टी झाली आहे. येथे २४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. .सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात नुकसानसांगली जिल्ह्यात द्राक्ष बागा आणि डाळिंब शेतात पाणी साचले आहे. यामुळे नुकसानीच्या भीतीने शेतकरी चिंतेत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात हलक्या स्वरुपाच्या पाऊस सुरु आहे. पण गेल्या दोन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे भात पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. ९० ते १२० दिवस कालावधीचे भात पीक सध्या परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहे. पावसामुळे हे पीक काही ठिकाणी आडवे झाले आहे. दरम्यान, १२० ते १४० दिवस कालाधीच्या भात पिकांसाठी हलक्या स्वरुपाचा पोषक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..Maharashtra Rain : दसऱ्यानंतरच पाऊस ओसरणार.कुठे, कुठे पावसाचा जोर?आज सकाळी ८ वाजेपर्यंत रायगड जिल्ह्यातील माथेरानमध्ये सर्वाधिक १३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील नंदगाव येथे ११८ मिमी पाऊस पडला आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथे ४८ मिमी, ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे १४३ मिमी, नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव येथे ३८ मिमी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथे ३१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, सांगली, जालना, बीड जिल्ह्यात पाऊस ओसरला आहे..कापूस, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसानगोदावरी नदीवरील जायकवाडी धरणात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. यामुळे धरणाचे सर्व दरवाजे खुले करण्यात आले आहेत. जायकवाडीतून सुरु असलेल्या अंबड तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या मौजे गोंदी, घुंगर्डे हादगाव आणि घनसावंगी तालुक्यातील मौजे मुद्रेगाव, बाणेगाव, शेवता, रामसगाव, गुंज आणि शिरसवाडी गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यात कापूस, सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, मूग, ज्वारी अशी संपूर्ण पिके पाण्यात सडून गेली आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.