Pune News: राज्याच्या तापमानात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. किमान तापमानात घट झाल्याने राज्यात काहीसा गारठा वाढला आहे. आज (ता. १०) राज्याच्या किमान तापमानातील घट पुढील दोन दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. दुपारच्या वेळी उकाडा राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..उत्तर भारतात थंडीचा कडाका काहीसा कमी झाला असून, सोमवारी (ता. ९) उत्तर प्रदेशच्या शहाजहानपूर येथे देशाच्या सपाट भुभागावरील नीचांकी ६.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये कर्नाटकच्या कारवार येथे देशातील उच्चांकी पारा ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली..Rain Update: उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात अंशत ढगाळ वातावरण; किमान तापमानात वाढ.सोमवारी (ता. ९) परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्यातील नीचांकी १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात १०.२ अंश सेल्सिअस, धुळे येथील कृषी महाविद्यालयात १०.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले..कोकणातील रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याने पहाटे गारठा वाढला असला तरी, दुपारच्या वेळी उकाडा कायम आहे. आज (ता. १०) किमान तापमानातील घट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..Maharashtra Weather: राज्याच्या किमान तापमानात घट शक्य.सोमवारी (ता. ९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३२---१३.८अहिल्यानगर---३१.८---११.५धुळे---३१---१०.३जळगाव---निरंक---१२.८जेऊर---३२.५---११कोल्हापूर---३१.२--१८.महाबळेश्वर---२७.२---१४.९मालेगाव---३१.२---१३.२नाशिक---३३.२---१४.५निफाड---३०.३---१०.२सांगली---निरंक---१६.४सातारा---३३.२---१४.५सोलापूर---३४.०---१७.७.सांताक्रूझ---३४.५---१९.०डहाणू---३१.५---१८.१रत्नागिरी---३६---१८.३छत्रपती संभाजीनगर---३१.५---१४.६धाराशीव---३१.८---१५.१परभणी---३०.८---१४.५परभणी (कृषी)---३०.३---१०अकोला---३३.३---१५.३.अमरावती---३३.२---१४.५बुलडाणा---३२---१६ब्रह्मपुरी---३२---१४.४चंद्रपूर---३२.४---१६.४गडचिरोली---३१.६---१४.६गोंदिया---२९---११.६नागपूर---३०.६---१३.२वर्धा---३२.८---१४वाशीम---३१.२---१३.८यवतमाळ---३१.८---१४.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---१०.२---३३.२पश्चिम महाराष्ट्र---११---३४मराठवाडा---१०---३१.८विदर्भ---११.६---३३.३कोकण---१८.१---३६राज्यात गारठा कायम असलेली ठिकाणे :परभणी (कृषी) १०, निफाड १०.२, धुळे १०.३..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.