Pune News: राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच, विदर्भासह राज्यात तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान होत आहे. गारठा कमी होऊन उन्हाचा चटका आणि उकाडा वाढू लागला आहे. आजपासून (ता. १९) राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..बुधवारी (ता. १८) उत्तर प्रदेशच्या बांदा येथे देशाच्या सपाट भुभागावरील नीचांकी ८.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये केरळच्या कोची येथे देशातील उच्चांकी ३६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली..दक्षिण बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले हवेचे कमी दाबाचे क्षेत्र कायम असून, आज (ता. १९) या प्रणालीची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रापासून मध्य प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे..Maharashtra Weather Update: काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज; ढगाळ हवामानामुळे राज्यातील तापमानात चढ उतार सुरु.बुधवारी (ता. १८) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३५.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात उन्हाचा चटका, उकाड्यात वाढ झाली असतानाच, राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत आहे. आज (ता. १९) राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे..बुधवारी (ता. १८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३३.५---१७.१अहिल्यानगर---३२.९---१५.५धुळे---३३.५---१४.६जळगाव---३४---१७जेऊर---३४---१४कोल्हापूर---३१.६--१९.२.Heatwave Alert: राज्यात उन्हाळ्याची चाहूल उन्हाचा चटका, उकाडा वाढला.महाबळेश्वर---२६.९---१५.८मालेगाव---३४.०---१८.८नाशिक---३१.८---१६.८निफाड---३१.३---१३.८सांगली---३२.२---१९.६सातारा---३२.१---१६.१सोलापूर---३४.४---२०.४सांताक्रूझ---३१---२२.४डहाणू---२८.७---१८.६रत्नागिरी---३२.४---२१.१.छत्रपती संभाजीनगर---३१.६---१८धाराशिव---३२.४---१६.८परभणी---३२.६---१८परभणी (कृषी)---३२.२---१४अकोला---३५.०---१९.५अमरावती---३४.२---१७.१भंडारा---३३---१८बुलडाणा---३३.६---१५.२ब्रह्मपुरी---३५.७---१४.४.चंद्रपूर---३४---१८.२गडचिरोली---३३.२---१५.६गोंदिया---३२.६---१४.६नागपूर---३३---१४.५वर्धा---३४---१५.८वाशीम---३४.६---१५.८यवतमाळ---३४---१५.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---१३.८---३४पश्चिम महाराष्ट्र---१४---३४.४मराठवाडा---१४---३२.६विदर्भ---१४.४---३५.७कोकण---१८.६---३२.४.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.