India Monsoon Return: निम्म्या राज्यातून मॉन्सून परतला
IMD Weather Update: नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. शनिवारी (ता. ३) देशाच्या मोठ्या भागातून मॉन्सूनने माघार घेतली. उत्तर भारतातील अनेक राज्यांसह महाराष्ट्राच्या जवळपास निम्म्या भागातूनही नैॡत्य मोसमी वारे परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.