Pune News : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. रविवारी (ता. १४) मॉन्सूनने पश्चिम राजस्थानमधून माघार घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. गेली काही वर्षे उशिराने माघारी फिरणाऱ्या मॉन्सूनने यंदा तीन दिवस आधीच परतीचा प्रवास सुरू केला आहे. मॉन्सूनने यंदा तब्बल २ महिने १६ दिवस राजस्थानमध्ये मुक्काम केला..वायव्य भारतात पावसाने सलग पाच दिवस उघडीप देणे. आर्द्रतेची टक्केवारी कमी होऊन कोरडे हवामान होणे, वाऱ्यांची दिशा बदलण्याबरोबरच परिसरावर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने केंद्रभागातून बाहेरच्या बाजूला वारे वाहणारी क्षेत्रे (ॲण्टी सायक्लोन) आदी प्रणाली तयार झाल्यानंतर मॉन्सून परतल्याचे जाहीर करण्यात येते.\.Monsoon Update: मॉन्सून सोमवारपासून परतीच्या प्रवासावर.रविवारी (ता. १४) राजस्थानच्या गंगानगर, नागौर, जोधपूर, बारमेरपर्यंतच्या भागांतून मॉन्सून परतल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. परतीच्या दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेनुसार १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू करण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. यंदा तीन दिवस आधीच मॉन्सूनने राजस्थानमधील तळ हलविला आहे..मोसमी वाऱ्यांच्या परतीस पोषक हवामान असल्याने पुढील दोन दिवसांत राज्यस्थानच्या आणखी काही भागासह पंजाब आणि गुजरातच्या काही भागातून मॉन्सून माघार घेण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले केले आहे. गतवर्षी २३ सप्टेंबर रोजी मॉन्सून वाऱ्यांनी राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू केला होता..Maharashtra Rain: राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता.दरम्यान, यंदा विक्रमी वेगाने आगमन करत २४ मे रोजी केरळसह कर्नाटक किनारपट्टीवर दाखल मॉन्सून झाला. मॉन्सूनने २५ मे रोजी तळ कोकणात दाखल होत महाराष्ट्रात धडक दिली. त्यानंतर वाटचाल अडखळल्याने १७ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाला. .पुढील प्रवास वेगाने करत अवघ्या १२ दिवसांत मॉन्सूनने देशात सर्वदूर मजल मारली. २९ जून रोजी मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.वायव्य भारतातून मॉन्सूनच्या परतीची वाटचालवर्ष---तारीख२०२१---६ ऑक्टोबर२०२२---२० सप्टेंबर२०२३---२५ सप्टेंबर२०२४---२३ सप्टेंबर२०२५---१४ सप्टेंबर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.