Pune News: ऑगस्ट महिन्याअखेरपर्यंत राज्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. १ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत राज्यात ८८१.९ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या ८ टक्के अधिक पाऊसमान झाले आहे. कोकण, घाटमाथ्यासह मराठवाड्याच्या दक्षिण भागात चांगला पाऊस झाला, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे. पावसातील खंड, कमी काळात जोरदार पाऊस, असमान वितरण मात्र चिंता वाढविणारे ठरले आहे..यंदाच्या हंगामाचा महिनानिहाय आढावा घेता जून महिन्यात मॉन्सूनचे वेगाने आगमन झाल्यानंतर मॉन्सून मंदावला होता. मात्र अखेरच्या टप्पात पुनरागमन करताना पावसाने सरासरी गाठली होती. जूनमध्ये २२२.३ मिलिमीटर (६ टक्के अधिक) पाऊस झाला मात्र वितरणात असमानता जाणवली. पुरेशा पोषक प्रणाली नसल्याने जुलै महिन्यातही अखेरीस झालेल्या पावसानेच तारले. जुलैमध्ये राज्यात ३२७.९ मिलिमीटर (१ टक्का अधिक) पावसाची नोंद झाली. दरम्यान १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत राज्यात सरासरी ५५०.१ मिलिमीटर म्हणजेच ३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली होती..जून आणि जुलै प्रमाणेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात पावसाची दडी दिसून आली. मात्र दुसऱ्या पंधरवाड्यात मॉन्सूनच्या पावसाने अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला. कोकण, घाटमाथा, मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अधिक होते. ऑगस्टमध्ये मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले. मात्र सर्वच विभागांमध्ये एकूण पावसाने सरासरी ओलांडल्याचे दिसून आले. केवळ ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरी २८०.८ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा १ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ३३१.८ (१८ टक्के अधिक) पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या नोंदीवरून स्पष्ट झाले..Monsoon Rain: कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज.ऑगस्ट अखेरपर्यंत राज्यात विभागनिहाय पडलेला पाऊसविभाग---सरासरी---पडलेला---टक्केवारीकोकण-गोवा---२४९६.७---२७९०.३---अधिक १२मध्य महाराष्ट्र---५८८.४---६४२.२---अधिक ९मराठवाडा---४८१.९---५३७.६---अधिक १२विदर्भ---७८१.८---८०८.१---अधिक ३.स्वातंत्र्य दिनानंतरच वाढला पाऊसपावसाला पोषक प्रणालींची अभाव असल्याने ऑगस्टच्या सुरुवातीला राज्यात पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र १३ ऑगस्टनंतर बंगालच्या उपसागरात कमी दाब प्रणालींची निर्मिती होऊ लागली. महिन्यात एकूण चार कमी दाब प्रणाली तयार झाल्या. यातील एक प्रणाली तीव्र झाली. मॉन्सूनचा आस सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे आला. तर किनाऱ्याला समांतर कमी दाबाच्या पट्ट्याने साथ दिल्याने १५ ऑगस्टनंतर पावसाचे प्रमाण वाढत गेले. अनेक ठिकाणी पावसाने धुमशान घातल्याने नद्यांना पूर येऊन पाणी पात्राबाहेर आले. या पावसाने महिन्याची सरासरी पार करण्यास मदत झाली..नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक, जालन्यात सर्वात कमीराज्यात सर्वदूर पाऊस झाला असला तरी वितरण मात्र असमान असल्याचे चित्र सातत्याने दिसून येत आहे. धरणांच्या पाणलोटातील पावसाने पाणीसाठा समाधानकारक आहे. यातच कमी काळात झालेल्या मोठ्या पावसामुळे सरासरीची स्थिती सुधारली. ऑगस्टअखेर नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक (३३ टक्के अधिक) पाऊस झाला. त्यापाठोपाठ नांदेड, धाराशिव, लातूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला आहे. तर जालना आणि सातारा जिल्ह्यांत यंदा पावसाचे प्रमाण कमी असून, तेथे पर्जन्यमानात अनुक्रमे २१ आणि २० टक्क्यांची तूट आहे..राज्यात जिल्हानिहाय पडलेल्या पावसाचे प्रमाण (तफावत टक्क्यांत) :सरासरीपेक्षा अधिक (२० ते ५९ टक्के अधिक) : मुंबई उपनगर, पालघर, नाशिक, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड.सरासरी इतका (उणे १९ ते १९ टक्के अधिक) : मुंबई शहर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.सरासरीपेक्षा कमी (उणे ५९ ते उणे २० टक्के) : सातारा, जालना..September Rain: सप्टेंबरमध्ये विदर्भात जोरदार तर मराठवाड्यात सरासरी पावसाचा अंदाज; मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज.ऑगस्ट अखेरपर्यंत राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती, सरासरीच्या तुलनेत तफावत :जिल्हा---सरासरी---पडलेला---तफावत (टक्के)मुंबई शहर---१७५८.५---१६५०.०---उणे ६मुंबई उपनगर---१९५९.२---२४९३.८---अधिक २७पालघर---१९३८.३---२३९१.७---अधिक २३रायगड---२६८९.७---३००७.५---अधिक १२रत्नागिरी---२७८३.४---३१८४.०---अधिक १४सिंधुदुर्ग---२६०६.७---२७६९.०---अधिक ६ठाणे---२०८७.१---२१८१.०---अधिक ५.अहिल्यानगर---३०८.७---३०३.०---उणे २धुळे---४२८.३---४०१.६---उणे ६जळगाव---४९९.०---४९२.४---उणे १कोल्हापूर---१५००.९---१९२३.३---अधिक २८नंदूरबार---६९१.३---६४७.०---उणे ६नाशिक---७१५.७---९४९.४---अधिक ३३पुणे---७६४.८---८६९.९---अधिक १४सांगली---३५२.८---४०७.०---अधिक १५सातारा---६८७.०---५५२.३---उणे २०.सोलापूर---२९२.४---२४१.०---उणे १८बीड---३९१.६---४३५.८---अधिक ११छ. संभाजीनगर---४१३.६---४३२.३---अधिक ५धाराशिव---४००.४---५१९.४---अधिक ३०हिंगोली---६१६.१---५२६.४---उणे १५जालना---४५०.६---३५४.३---उणे २१लातूर---४९०.३---६१५.१---अधिक २५नांदेड---६२२.०---८२१.१---अधिक ३२.परभणी---५३६.३---५६९.९---अधिक ६अकोला---५७८.३---५०६.३----उणे १२अमरावती---६७८.९---५७६.९---उणे १५भंडारा---९११.६---८९६.४---उणे २बुलडाणा---५२४.३---५३०.६--- १चंद्रपूर---९०५.३---९६४.४---अधिक ७गडचिरोली---१०८८.०---१२४३.५---अधिक १४गोंदिया---१०३२.८---९७७.०---उणे ५नागपूर---७७७.६---७९६.६---अधिक २वर्धा---६९०.८---७४९.६---अधिक ९वाशीम---६३२.६---६६३.८---अधिक ५यवतमाळ---६७६.६---८३९.४---अधिक ९.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.