Weekly Weather: बहुतांशी जिल्ह्यांत पावसाची शक्यता
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रावर या आठवडाभर १००६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. तसेच कोकण, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रात वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भ व मध्य विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली व सोलापूर जिल्ह्यांत वाऱ्याच्या ताशी वेगात वाढ होईल.