Pune News: राज्यात ढगाळ हवामान आणि पावसाच्या अंदाजामुळे थंडीचा कडाका कमी झाला आहे. किमान आणि कमाल तापमानात वाढ दिसून आली. राज्यातील थंडीचा कडाका पुढील ३ दिवस कमीच राहू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. .आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी ढगाळ हवामान होते. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड ढगाळ हवामानसह काही ठिकाणी अगदी हलक्या पावसाचा अंदाज आहे..Winter Weather Forecast: तापमानात चढ-उतार शक्य; गारठा कायम.मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली तर मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर जिल्ह्यातही ढगाळ हवामानसाह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची शक्यता आहे..Weekly Weather: कमाल, किमान तापमानात वाढ शक्य.उद्याही राज्यात ढगाळ हवामानाचा अंदाज आहे. उद्या अहिल्यानगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड जिल्ह्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे..तर मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात ढगाळ हवामानाचा अंदाज आहे. यामुळे राज्यात पुढील ३ दिवस थंडीचा कडाका कमी राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.