Pune News: राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा अधिक आहे. थंडी कमी झालेली आहे. आज आणि उद्याही राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. .राज्यात आजही पावसाला पोषक हवामान असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. आज धुळे, नंदूरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे..Rain Update: राज्यात पावसाला पोषक हवामान; पाच जिल्ह्यात पावसाचा इशारा.तसेच यावेळी ३० ते ४० प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. .Maharashtra Winter Weather: उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा.उद्या धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला..राज्यातील ढगाळ हवामानामुळे किमान तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे. तसेच थंडी कमीच राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.