Rain Forecast: राज्यात सर्वदूर समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आज (ता. २९) अमरावतीत जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, उर्वरित राज्यात मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा अंदाज कायम असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे..रविवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपूरी आणि गोंदिया येथे राज्यातील उच्चांकी ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पावसाच्या हजेरीने राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होत असून, राज्यात उकाडा वाढला आहे. अनेक ठिकाणी राज्याचा कमाल तापमानाचा ३६ अंशांच्याखाली घसरला आहे. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १८.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले..मध्य महाराष्ट्रातील लोणावळा येथे राज्यातील उच्चांकी ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींनी हजेरी लावली. आज (ता. २९) विदर्भातील अमरावती जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. कोकणातील मुंबई, रायगड, रत्नागिरीसह पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने, तसेच उर्वरित राज्यात मेघगर्जना विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे..Weekly Weather: मॉन्सून पावसाचे वितरण वाढण्याची शक्यता.मॉन्सून प्रगती नाहीनैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता. २४) संपूर्ण महाराष्ट्र व्यापून, गुजरात, मध्य प्रदेशाचा काही भाग, छत्तीसगड आणि झारखंडच्या आणखी काही भागात मॉन्सूनने वाटचाल केली. त्यानंतर मात्र मॉन्सूनची वाटचाल पुन्हा थबकली आहे. रविवारी (ता. २८) मॉन्सूनची प्रगती झालेली नाही. पुढील दोन ते तीन दिवसांत उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेशच्या आणखी काही भागासह, छत्तीसगड, झारखंड, बिहारचा उर्वरित भाग तसेच उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३३.७---२३.८अहिल्यानगर---३४.९---२४.३धुळे---३८.०---२३.०जळगाव---३५.५---२३.७जेऊर---३१.०---२०.५कोल्हापूर---३२.६--२३.४महाबळेश्वर---२४.२---१८.९मालेगाव---३७.०---२३.८.नाशिक---३५.१---२४.२निफाड---३६.२---२३.५सांगली---३३.८---२३.०सातारा---३४.३---२४.४सोलापूर---३५.१---२४.९सांताक्रूझ---३३.४---२६.०डहाणू---३४.५---२७.८रत्नागिरी---३२.५---२५.४.छत्रपती संभाजीनगर---३३.४---२३.०धाराशिव---३१.०---२१.०परभणी---२९.४---२३.५परभणी (कृषी)---२९.०---२२.८अकोला---३४.५---२४.१अमरावती---३५.२---२२.८भंडारा---३७.०---२५.०बुलडाणा---३२.२---२३.८.Maharashtra Monsoon Update: समाधानकारक पावसाची प्रतीक्षा.ब्रह्मपूरी---३८.०---२४.५चंद्रपूर---३६.८---२६.८गडचिरोली---३४.८---२६.२गोंदिया---३८.०---२४.२नागपूर---३७.४---२४.२वर्धा---३६.०---२५.२वाशीम---३०.८---२१.४यवतमाळ---निंरक---२०.०.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---२३.०---३७.०पश्चिम महाराष्ट्र---१८.९---३५.१मराठवाडा---२१.०---३३.४विदर्भ---२१.४---३८.०कोकण---२५.४---३४.५.जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :अमरावती.जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा.विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :ठाणे, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.