Maharashtra Climate Update: महाराष्ट्रात नैॡत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) हंगाम संपला आहे. राज्यात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका वाढला असून, ‘ऑक्टोबर हीट चांगलीच तापदायक ठरत आहे. आज (ता. ९) कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत असून, बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा सातत्याने ३५ अंशांच्या वरच आहे. गुरुवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अमरावती येथे राज्यातील उच्चांकी ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे..Rain Forecast: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता.यवतमाळ येथे ३८ अंश सेल्सिअस, तर धुळे, जळगाव, सोलापूर, अकोला, वर्धा, रत्नागिरी आणि चंद्रपूर येथे ३७ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १७.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले..Maharashtra Rain Forecast: कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज.आज (ता. ९) कोकणात उन्हाचा ताप वाढणार असून, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. .तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.