Pune News : महाराष्ट्रात सुरू असलेला दमदार पाऊस आणि सद्य:स्थितीतील तीव्र वातावरणीय प्रणालीमुळे देशात परतीच्या मार्गांवर असलेला मॉन्सून आठवडाभर जागेवरच थबकणार आहे. महाराष्ट्रात पावसासाठी वातावरण पूरकतेची शक्यता टिकून राहणार आहे. त्यामुळे दसऱ्यांनतर राज्यात पावसाची उघडीप मिळणार असल्याचे हवामान विभागाचे निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले..मॉन्सूनच्या परतीची वेरावळ, भरूच, उज्जैन, झाशी, शहाजहानपूर ह्या शहरादरम्यान असलेली सीमारेषा ३ ऑक्टोबरपर्यंत कायम राहणार आहे. बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्र मार्गे गुजरात अरबी समुद्राकडे जाणारी कमी दाब प्रणाली तीव्र झाल्यानंतर पुन्हा ओसरू लागली आहे. महाराष्ट्रात दसऱ्यापर्यंत अपेक्षित असलेल्या जोरदार पावसाला ही प्रणाली पूरक ठरण्याची शक्यता कायम जाणवणार असल्याचे श्री. खुळे यांनी स्पष्ट केले..Nanded Heavy Rainfall: नांदेडला पुन्हा जोरदार पावसाचा तडाखा.मराठवाड्यात जोर कमी होणारगेल्या आठवड्यापासून हवेच्या तीव्र कमी दाब वातावरण प्रणालीच्या नेमक्या प्रभावी टप्प्यात सापडलेल्या दक्षिण मराठवाड्यातील जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात मंगळवारपासून (ता. ३०) दोन ते तीन दिवसांसाठी पावसाची काहीशी उघडीप मिळण्याची शक्यता आहे. .Rainfall Update : वाशीम, अकोल्यात पावसाचा पुन्हा जोर.पूरजन्य परिस्थिती कायम राहणारसंपूर्ण मराठवाडा, विदर्भ व जळगाव, नाशिक, अहिल्यानगर व सोलापूर यासह महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांत मंगळवारपर्यंत (ता. ३०) पूरजन्य परिस्थितीची शक्यता कायम आहे. धरण क्षेत्रातून नद्यांच्या पात्रात होणाऱ्या विसर्गामुळे पुन्हा एकदा पूर स्थितीची शक्यता जाणवते..उपसागरात नव्याने कमी दाब क्षेत्रमंगळवारी (ता. ३०) अंदमानजवळील बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्मिती होणार आहे. त्यामुळे उत्तर-मध्य भारताकडे त्याची मार्गक्रमणाची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ८ व ९ ऑक्टोबर दरम्यानच्या जोरदार स्वरूपाच्या रब्बी पावसाच्या चौथ्या आवर्तनाचा अपेक्षित धोका कमी होणार आहे..दसऱ्यानंतर खरीप पिकांची काढणी शक्यमहाराष्ट्रात शुक्रवारपासून (ता. ३) पूर्णतः नसली तरी काहीशी उघडिपीची शक्यता जाणवते. त्यामुळे कांदा बियाणे टाकणी, खरिपातील मका, सोयाबीन, बाजरी, भुईमूग, व आगाप भात पिकांची काढणी, द्राक्ष - बाग छाटणी, वाफश्यानंतर भाजीपाला पीक काढणी, हरभरा व ज्वारी पेरणी, रब्बीच्या पुढील इतर लागवडीसाठी पूर्व मशागत, या शेतीकामांचा दसऱ्यानंतर विचार होऊ शकतो. मुंबईत मात्र दसऱ्यानंतरही जोरदार पावसाची शक्यता कायम जाणवते, असेही श्री. खुळे यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.