Pune News: शेती प्रधान भारतासाठी वरदान ठरलेल्या नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरुवारी (ता. १६) देशाचा निरोप घेतला. मॉन्सून महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून माघारी जाताच दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर यंदा तब्बल ४ महिने २३ दिवस देशात मुक्काम केला..भारताच्या दक्षिणेकडील कोमोरीन भागात असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती, दक्षिण द्वीपकल्प, दक्षिण आणि मध्य बंगालच्या उपसागरात पूर्व आणि ईशान्येकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाह, तसेच तमिळनाडू, पुदुच्चेरी, आंध्रची किनारपट्टी, रायलसीमा आणि केरळ राज्यात सुरू असलेला पाऊस या नोंदींच्या आधारे नैॡत्य मोसमी वारे परतून,.Maharashtra Rain: कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा .ईशान्य मोसमी वाऱ्यांचा हंगाम सुरू झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. यंदा विक्रमी वेगाने आगमन करत मॉन्सून २४ मे रोजी केरळसह कर्नाटक किनारपट्टीवर दाखल झाला. मॉन्सूनने २५ मे रोजी तळ कोकणात दाखल होत महाराष्ट्रात धडक दिली. .त्यानंतर वाटचाल अडखळल्याने १७ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाला. पुढील प्रवास वेगाने करत अवघ्या १२ दिवसांत मॉन्सूनने देशात सर्वदूर मजल मारली. २९ जून रोजी मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले..Weather Forecast: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज.मोसमी वाऱ्यांनी १४ सप्टेंबर रोजी वायव्य राजस्थान आणि कच्छमधून परतीचा प्रवास सुरू केला. २६ सप्टेंबरपासून मॉन्सूनचा परतीचा प्रवास अडखळला, १० ऑक्टोबर रोजी मॉन्सूनने उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागातून माघार घेतली होती..सोमवारी (ता. १३) महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून परतल्यानंतर गुरुवारी (ता. १६) मॉन्सूनने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला अलविदा केला. दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वाऱ्यांचा पाऊस सक्रिय झाला असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.