Indian Monsoon Rainfall Prediction: संपूर्ण भारतवर्षासाठी वरदान असलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) अंदमानातील आगमनासाठी पोषक हवामान झाले आहे. आठवड्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच पुढील चार ते पाच दिवसांत मॉन्सून अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मॉन्सून अंदमानात धडकण्याचा सांगावा मिळताच, केरळातील आगमनाबाबत आशा पल्लवित झाल्या आहेत..दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता मॉन्सून साधारणत: २१ मेपर्यंत अंदमानाची राजधानी पोर्टब्लेअर येथे पोहोचतो. त्यापूर्वीच तो दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होतो. तर एक जूनपर्यंत मॉन्सून केरळमध्ये डेरेदाखल होतो. यातच पुढील चार ते पाच दिवसांत दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान निकोबार बेटांवर मॉन्सून दाखल होण्याचे संकेत मिळत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे..Maharashtra Heat Wave: राज्यात उष्णतेची लाटेचा इशारा; राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमधील तापमानवाढीचा अंदाज.गत वर्षीदेखील १३ मे रोजी मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला होता. तर केरळमध्ये तब्बल आठवडाभर आधी म्हणजेच २४ मे रोजी डेरे दाखल झालेला मॉन्सून २५ मे रोजी महाराष्ट्राच्या तळ कोकणात पोहोचला होता. गेल्या वर्षी देशात सरासरीपेक्षा आठ टक्के अधिक, तर महाराष्ट्रात २० टक्के अधिक पाऊस पडला होता. यंदा मॉन्सूनच्या पावसावर ‘एल निनो’चे सावट असण्याची शक्यता असल्याने देशात सरासरीपेक्षा कमी म्हणजेच ९२ टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे..Maharashtra Heatwave Alert: उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारा.दरम्यान, मॉन्सूनच्या केरळातील आगमनाचा मुहूर्त हवामान विभागाकडून लवकरच जाहीर केला जाईल. मे महिन्याच्या अखेरीस मॉन्सून हंगामाचा सुधारित दीर्घकालीन अंदाज व विभागानिहाय पावसाचे वितरण स्पष्ट करण्यात येणार आहे..बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्रनैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात मंगळवारी (ता. १२) कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने उद्यापर्यंत (ता. १४) ही प्रणाली आणखी तीव्र होणार आहे. या कमी दाब क्षेत्रापासून तमिळनाडू, रायलसीमा, उत्तर कर्नाटक ते मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.