Maharashtra Weather Alert: राज्यात थंडी वाढल्यानंतर किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात गारठा कायम असताना उर्वरित राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अंशतः ढगाळ हवामान झाले. आज (ता. २३) राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..‘अक्वान’ चक्रीवादळाचे अवशेष असलेले कमी दाबाचे क्षेत्र उत्तर छत्तीसगड आणि परिसरावर सक्रिय होते. उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात परिसरात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तरेकडील थंड वारे पुन्हा अडखळल्याने, तसेच अंशतः ढगाळ हवामानामुळे राज्यातील गारठा काहीसा कमी झाला आहे..रविवारी (ता. २२) जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ८ अंश सेल्सिअस, धुळे येथील कृषी महाविद्यालयात प्रत्येकी १०.४ अंश, निफाड येथील गहू संशोधन केंद्रात १०.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिक, सातारा येथे १३ अंशांपेक्षा कमी, पुणे येथे १४ अंशांपेक्षा कमी आणि जेऊर, महाबळेश्वर, वाशीम येथे १५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. .Maharashtra Cold Weather: मध्य महाराष्ट्रात गारठा कायम.किमान तापमानासह कमाल तापमानात देखील वाढ होत असून, रविवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३५.१ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी आणि सांताक्रूझ येथे प्रत्येकी ३३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० अंशांच्या वरच आहे..‘अक्वान’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. आज (ता. २३) राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानात झालेली वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..Weekly Weather: पूर्व विदर्भात पावसाची शक्यता.रविवारी (ता. २२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये)ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३३.१---१३.२अहिल्यानगर---३२.२---निरंकधुळे---३१.४---१०.४जळगाव---३०.५---८.०जेऊर---३२.०---१४.२कोल्हापूर---३०.६---१५.८महाबळेश्वर---२६.३---१४.९.नाशिक---३१.६---१२.७निफाड---३१.८---१०.७सांगली---३१.५---१४.५सातारा---३२.२---१२.५सोलापूर---३५.१---१८.५सांताक्रूझ---३३.०---१७.६डहाणू---३१.१---१६.५रत्नागिरी---३३.०---१७.६.छत्रपती संभाजीनगर---३१.१---१६.६धाराशिव---३१.६---१९.४परभणी---३१.८---१९.४परभणी (कृषी)---३०.५---१५.९अकोला---३१.१---१७.५अमरावती---३१.६---१७.७ब्रह्मपूरी---२४.२---२०.२.बुलडाणा---३०.५---१८.७चंद्रपूर---२५.४---२०.२गडचिरोली---२६.४---१७.५गोंदिया---२४.०---१९.५नागपूर---२५.८---२०.४वर्धा---२८.६---१९.६वाशीम---३०.२---१४.४यवतमाळ---३०.०---१६.४.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---८.०---३२.२पश्चिम महाराष्ट्र---१३.२---३५.१कोकण---१६.५---३३.०मराठवाडा---१५.९---३१.८विदर्भ---१४.४---३१.६राज्यात गारठा वाढलेली ठिकाणे (तापमान अंश सेल्सिअसमध्ये) : जळगाव ८, धुळे १०.४, निफाड १०.७, नाशिक १२.७, सातारा १२.५, पुणे १३.२..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.