Maharashtra Weather Update: मराठवाड्यातील बीड, जालना, धाराशिव, लातूरसह मध्य महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात आज (ता. १९) विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात जोरदार सरींचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने संबंधित जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे..मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या फिरोजपूर पासून, डेहराडून, शाहजहानपूर, वाराणसी, देहरी, तीव्र कमी दाब क्षेत्राचे केंद्र, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय होता. पूर्व उत्तर प्रदेश परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून गुजरातपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे..मंगळवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १७.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे सर्वाधिक ८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली..Maharashtra Rain Update: मराठवाडा आणि विदर्भातील ६ जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप?.आज (ता. १९) विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात जोरदार सरींची शक्यता असल्याने, तसेच मध्य महाराष्ट्रातील सोलापूरसह, मराठवाड्यातील जालना, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..तीव्र कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवरओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत तयार झालेले तीव्र कमी दाब क्षेत्र (डिप्रेशन) जमिनीवर आले आहे. झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये सक्रिय असलेल्या या प्रणालीचे केंद्र ताशी १० किलोमीटर वेगाने वायव्येकडे सरकत आहे. ही प्रणाली झारखंडच्या हजारीबागपासून ५० किलोमीटर पूर्वेकडे, रांचापासून ८० किलोमीटर ईशान्येकडे, तसेच बिहारच्या गयापासून १३० किलोमीटर आग्नेयेकडे होती. आज (ता. १९) या प्रणालीची तीव्रता कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे..मंगळवारी (ता. १८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---२७.४---२२.१अहिल्यानगर---२९.०---२४.३धुळे---३२.०---२०.०जळगाव---३१.२---२२.०जेऊर---३२.०---२१.५कोल्हापूर---२५.६---२१.६महाबळेश्वर---१९.३---१७.८.मालेगाव---निरंक---२१.२नाशिक---२६.९---२२.०निफाड---२७.३---२१.५सांगली---२७.२---२२.३सातारा---२६.१---२२.०सोलापूर---३०.५---निरंकसांताक्रूझ---२९.४---२४.८.Maharashtra Weather: राज्यात पावसाची उघडीप कायम.डहाणू---३०.६---२४.५रत्नागिरी---३०.०---२५.६छत्रपती संभाजीनगर---२७.६---२२.२धाराशिव---२९.०---२१.८परभणी---३१.२---२३.२परभणी (कृषी)---३१.६---२१.७अकोला---३३.५---२४.४.अमरावती---३०.०---२३.१ब्रह्मपूरी---३०.४---२३.४बुलडाणा---२९.०---२२.०चंद्रपूर---३२.२---२५.२गडचिरोली---३०.६---२४.२गोंदिया---२७.५---२१.६नागपूर---३०.४---२३.०वर्धा---३१.०---२४.५वाशीम---२९.०---२०.४यवतमाळ---३०.५---२२.६.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---२०.०---३२.०पश्चिम महाराष्ट्र---१७.८---३२.०कोकण---२४.५--३०.८मराठवाडा---२१.७---३१.६विदर्भ---२०.४---३३.५.जोरदार पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : गोंदिया.विजांसह वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : सोलापूर, जालना, बीड, धाराशिव, लातूर..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.