Thunder Storm: पूर्वमोसमी पावसाचा हंगाम सुरू होताच राज्याला वादळी वाऱ्यांसह पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला आहे. आज (ता. २०) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. .मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, त्यापासून विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे पावसाला पोषक हवामान होत आहे. गुरुवारी (ता. १९) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर प्रदेशातील बांदा येथे देशातील उच्चांकी ३९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर पंजाबच्या फरिदकोट येथे नीचांकी १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. .Weather Update: २८ जिल्ह्यात पावसाचा इशारा; तर तुरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज.दरम्यान, राज्यातील उष्णतेची लाट काहीशी कमी झाली असून, गुरुवारी (ता. १९) वाशीम येथे राज्यातील उच्चांकी ३८.४ अंश तापमान नोंदले गेले. जळगाव आणि अकोला येथे ३७ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. आज (ता. २०) मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात राज्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, मेघगर्जना, विजांसह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.वादळी पावसाचा इशारा. (येलो अलर्ट) : सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर.उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे : वाशीम ३८.४, जळगाव ३७.३, अकोला ३७.२..गुरुवारी (ता. १९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये)शहर कमाल किमानपुणे ३५.२ १९.४अहिल्यानगर ३५.२ १८.३धुळे ३५.५ १५.०जळगाव ३७.३ १८.५जेऊर ३६.० १६.५कोल्हापूर ३४.७ १७.२महाबळेश्वर २८.२ १६.६मालेगाव ३६.० १६.८नाशिक ३४.५ १८.३.Weather Update: कोकणात उष्ण लाट, विदर्भात पावसाचा अंदाज.निफाड ३५.८ १६.६सांगली ३२.६ २०.३सातारा ३५.२ १९.५सोलापूर ३६.४ २२.८सांताक्रूझ ३१.३ २१.२डहाणू ३१.५ २०.०रत्नागिरी ३२.८ २२.४.छत्रपती संभाजीनगर ३४.५ १८.८धाराशिव ३६.८ १८.६परभणी ३६.२ २१.२परभणी (कृषी) ३३.५ १७.०अकोला ३७.२ २३.८अमरावती ३५.४ १९.१भंडारा ३१.० १९.०बुलडाणा ३६.२ २१.८ब्रह्मपुरी ३२.८ १८.५.चंद्रपूर ३३.६ २०.५गडचिरोली ३२.४ २०.२गोंदिया ३१.६ १८.६नागपूर ३४.६ १७.१वर्धा ३६.० १८.८वाशीम ३८.४ १९.२यवतमाळ ३४.२ २०.२.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.