Maharashtra Weather Forecast: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘मुरासू’ चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे. राज्यात पावसाने उघडीप दिली असून, कोकणात कमाल तापमानाचा पारा पस्तिशी पार गेला आहे. आज (ता. ५) राज्यात ढगाळ हवामानासह तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे..पावसाने उघडीप देताच, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुंबईतील कुलाबा येथे राज्यातील उच्चांकी ३६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर डहाणू, सांताक्रूझ, आणि रत्नागिरी येथे ३५ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. जळगाव, सोलापूर, अकोला आणि अमरावती आणि चंद्रपूर येथे ३४ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंदले गेले..दरम्यान किमान तापमानात चढ-उतार सुरू असल्याने राज्यात अद्यापही थंडीची प्रतीक्षा आहे. बुधवारी (ता. ४) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. आज (ता. ५) राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे..Rain Update: दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींचा अंदाज.तेलंगणामध्ये तीव्र कमी दाबाचे क्षेत्रबंगालच्या उपसागरात आलेले ‘मुरासू’ तीव्र चक्रीवादळ जमिनीवर येताच त्याची तीव्रता कमी झाली आहे. चक्रवादळाचे अवशेष म्हणून, बुधवारी (ता. ४) तेलंगणामध्ये तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) सक्रिय होते. उत्तरेकडे सरकताना या प्रणालीची तीव्रता आणखी कमी होणार आहे. कोकण आणि गोवा परिसरावर १.५ किलोमीटर उंचीवरच चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे..बुधवारी (ता. ४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये)ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३१.८---१९.७अहिल्यानगर---३२.८---२२.३धुळे---३३.६---१५.०जळगाव---३४.३---१८.८जेऊर---३३.५---१९.५कोल्हापूर---३१.२---२३.५महाबळेश्वर---२५.९---१७.४.नाशिक---३३.३---१८.२निफाड---३३.४---१६.५सांगली---३२.८---२३.१सातारा---३३.१---२०.५सोलापूर---३४.८---२२.४सांताक्रूझ---३५.०---२३.९डहाणू---३५.५---२२.९रत्नागिरी---३५.०---२४.६.Maharashtra Rain Alert: राज्यात विजांसह पावसाचा अंदाज कायम.छत्रपती संभाजीनगर---३३.६---१९.६धाराशिव---३३.६---१९.६परभणी---३३.०---१९.४परभणी (कृषी)---३२.५---१७.४अकोला---३४.५---२२.०अमरावती---३४.०---२१.१भंडारा---३३.०---२०.०ब्रह्मपुरी---३१.०---२२.४बुलडाणा---३१.५---२१.२.चंद्रपूर---३२.६---२२.८गडचिरोली---३१.४--२१.६गोंदिया---३१.८---१८.८नागपूर---३३.०---२१.०वर्धा---३३.०---२०.९वाशीम---३२.४---२०.४यवतमाळ---३२.८---१७.४.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---१५.०---३४.३पश्चिम महाराष्ट्र---१७.४---३४.८कोकण---२२.९--३६.५मराठवाडा---१७.४---३३.६विदर्भ---१७.४---३४.५.विजांसह पावसाची शक्यता : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड.उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे (तापमान अंश सेल्सिअसमध्ये) : कुलाबा ३६.५, डहाणू ३५.५, सांताक्रूझ ३५, रत्नागिरी ३५..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.