IMD Weather Forecast: राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान होत आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानाचा चटका कायम असल्याने उकाडा घामटा काढत आहे. आज (ता. ७) राज्यात अंशः ढगाळ हवामानासह तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..‘मुरासू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर पूर्व तेलंगणा आणि आंध्र प्रदेश परिसरावर समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच केरळच्या किनाऱ्यापासून दक्षिण कर्नाटक पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे.पावसाने उघडीप देताच, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मुंबईतील कुलाबा येथे राज्यातील उच्चांकी ३६.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर रत्नागिरी, सोलापूर येथे ३६ अंशापेक्षा अधिक, तर सांताक्रूझ, सांगली येथे ३५ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली..Hawaman Andaj: राज्यातील काही भागात किमान तापमानात घट.दरम्यान, किमान तापमानात चढ-उतार सुरू असल्याने राज्यात अद्यापही थंडीची प्रतीक्षा आहे. शुक्रवारी (ता. ६) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. आज (ता. ७) राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे..शुक्रवारी (ता. ६) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये)ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३३.१---१९.१अहिल्यानगर---३३.८---२३.२धुळे---३४.४---१५.५जळगाव---३४.७---१९.६जेऊर---३४.५---१९.०कोल्हापूर---३२.९---२२.१महाबळेश्वर---२५.५---१६.८ .नाशिक---३३.९---१७.३निफाड---३३.५---१५.२सांगली---३५.०---२१.९सातारा---३३.७---२०.३सोलापूर---३६.७---२२.५सांताक्रूझ---३५.४---२३.२डहाणू---३४.१---२१.४रत्नागिरी---३६.८---२४.१.Rising Temperature: उन्हाचा चटका, उकाडा वाढला.छत्रपती संभाजीनगर---३३.४---१९.६धाराशिव---३३.६---१९.०परभणी---३४.०---१८.५परभणी (कृषी)---३३.०---१७.६अकोला---३४.८---२१.३अमरावती---३४.६---१९.०ब्रह्मपुरी---३२.४---२०.२.बुलडाणा---३१.४---२०.०चंद्रपूर---३३.५---२२.२गडचिरोली---३१.४--१९.४गोंदिया---३१.६---१५.२नागपूर---३२.७---१६.२वर्धा---३३.०---१७.८वाशीम---३३.२---१९.४यवतमाळ---३३.६---१७.६.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---१५.२---३४.७पश्चिम महाराष्ट्र---१६.८---३६.७कोकण---२१.४--३६.९मराठवाडा---१६.७---३४.०विदर्भ---१६.२---३४.८उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे (तापमान अंश सेल्सिअसमध्ये) :कुलाबा ३६.९, रत्नागिरी ३६.८, सोलापूर ३६.७, सांताक्रूझ ३५.४, सांगली ३५..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.