Pune News: राज्याच्या कमाल तापमानात वाढ होऊ लागल्याने फेब्रुवारी महिन्याचा उन्हाच्या झळा अनुभवायला मिळत आहेत. कोकणातील भिरा येथे कमाल तापमानाचा पारा ३९ अंशांवर पोहोचला आहे. किमान तापमानात देखील हळूहळू वाढ होत आहे. आजपासून (ता. १२) कोकणच्या कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी झाला असून, बुधवारी (ता. ११) पश्चिम राजस्थानच्या पाली येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील भिरा येथे देशातील उच्चांकी ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे..Maharashtra Winter Weather: राज्याच्या किमान तापमानात वाढ शक्य.मंगळवारी (ता. १०) परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्यातील नीचांकी १०.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर कोकणातील भिरा येथे राज्यातील उच्चांकी ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उन्हाचा चटका वाढल्याने उकाड्यातही वाढ होत आहे. आज (ता. १२) किमान तापमान स्थिर राहणार असून, कोकण आणि गोव्याच्या कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे..बुधवारी (ता. ११) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये)ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३२.४---१५अहिल्यानगर---३२---१३.४धुळे---३२---१२जळगाव---३३.१---१४.६जेऊर---३३.५---११.५कोल्हापूर---३१.९--१८.२.महाबळेश्वर---२७.१---१५.१मालेगाव---३३.४---१४.४नाशिक---३२.८---१४.५निफाड---३२---१२सांगली---३४.२---१७.१सातारा---३३.१---१६.१सोलापूर---३४.७---१९.४.Maharashtra Weather Update: किमान तापमानात चढ उतार सुरुच; कमाल तापमान वाढल्याने दुपारी उन्हाचा चटकाही वाढला.सांताक्रूझ---३१.६---१९.२डहाणू---३०.१---२०.१रत्नागिरी---३२.२---१९.२छत्रपती संभाजीनगर---३१.८---१५.३धारशिव---३२.५---१५.३परभणी---निरंक---१५परभणी (कृषी)---३१.७---१०.९.अकोला---३४.६---१७.८अमरावती---३४.८---१५.३बुलडाणा---३१.६---निरंकब्रह्मपुरी---३४.३---१५.६चंद्रपूर---३३.४---१६.४गडचिरोली---३३.४---१६.४गोंदिया---३०.४---१३.४.नागपूर---३१.९---१३.६वर्धा---३३.०---१५.१वाशीम---३१.६---१४.६यवतमाळ---३२--१६.२.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---१२---३३.४पश्चिम महाराष्ट्र---११.५---३४.५मराठवाडा---१०.९---३२.५विदर्भ---१३.४---३४.८कोकण---१९.२---३९.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.