IMD Forecast: महाराष्ट्रावर आज (ता.२१) १००६ ते १००८ हेप्टापास्कल इतके हवेचे दाब राहतील. त्यामुळे हलक्या पावसानंतर पावसात उघडीप राहणे शक्य आहे. उद्या (ता.२२) महाराष्ट्राचे पूर्व भागावर १००४, तर उर्वरित महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्कल इतके हवेचे दाब होताच पूर्व भागात मध्यम स्वरूपात आणि उर्वरित भागात हलक्या पावसाची शक्यता राहील. मात्र मंगळवारी (ता.२३) पुन्हा उत्तरेकडील भागावर १००६ आणि मध्य भागापासून दक्षिण भागापर्यंत १००८ हेप्टापास्कल हवेचे दाब होताच पुन्हा उत्तरेकडील भागात हलक्या पावसाची शक्यता राहील. .तर मध्य भागापासून दक्षिण भागात उघडिपीसह आणि सूर्यप्रकाश जाणवेल. बुधवारी (ता.२४) पुन्हा हवेचे दाब १००६ हेप्टापास्कल होताच हलक्या पावसाची शक्यता आणि पावसात बराच काळ उघडीप राहील. गुरुवारी (ता.२५) महाराष्ट्राच्या उत्तरेकडील व पूर्व भागावर १००४ हेप्टापास्कल आणि उर्वरित महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्कल हवेचा दाब होताच उत्तर पूर्व भागात मध्यम स्वरूपात आणि उर्वरित भागात हलक्या पावसाची शक्यता राहील. मात्र शुक्रवारी (ता.२६) पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रावर १००४ हेप्टापास्कल इतके हवेचा दाब होताच पावसाचे प्रमाणात वाढ होऊन मध्यम पावसाची शक्यता राहील..त्यामुळेच या आठवड्यात हलक्या पावसानंतर उघडीप अशी स्थिती राहील. या आठवड्यातही काही दिवशी ईशान्य मॉन्सूनचा जोर जाणवेल. प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान इक्वॅडोरजवळ २४ अंश सेल्सिअस, तर पेरुजवळ १४ अंश सेल्सिअस इतके कमी झाल्यामुळे तेथे तापमान थंड असल्याने हवेचे दाब वाढून हिंदी महासागरावरील बाष्पयुक्त वारे तिकडे न जाता भारताचे दिशेने येत आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होऊन बऱ्याच भागात अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य स्थिती निर्माण होत आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही स्थिती जाणवण्याची शक्यता राहील..Monsoon Weather Alert: राज्यात वादळी पावसाचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पुढील ५ दिवस पावसाची शक्यता.कोकणआज (ता.२१) सिंधुदुर्ग रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ७ ते १० मि.मी., तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत ४ ते ५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याच्या दिशेत बदल झाल्याने पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. वाऱ्याची दिशा सिंधुदुर्ग जिल्ह्यात वायव्येकडून, तर रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेगही मंदावेल आणि तो ताशी १ ते ४ कि.मी. राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के राहील. या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी राहील..उत्तर महाराष्ट्रआज (ता.२१) नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ३ मि.मी., तर जळगाव जिल्ह्यात ५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. तसेच धुळे व जळगाव जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. नाशिक व जळगाव जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ९ कि.मी., तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ताशी १० कि.मी. राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस आणि जळगाव जिल्ह्यात ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८९ ते ९७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७५ टक्के राहील..मराठवाडाआज (ता.२१) हिंगोली जिल्ह्यात २ मी.मी., तर धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. जालना जिल्ह्यात आज (ता.२१) ६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण कमी होण्यामागे हवेचे दाब वाढणे व वाऱ्याच्या दिशेत बदल होणे ही कारणे आहेत..Heavy Rain: राज्यात विजांसह पावसाचा अंदाज कायम.मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १० कि.मी., तर नांदेड, हिंगोली, जालना जिल्ह्यांत ताशी ११ कि.मी. राहील. धाराशिव, बीड व परभणी जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १२ कि.मी., तर लातूर जिल्ह्यात ताशी १३ कि.मी.राहील. कमाल तापमान बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमान धाराशिव, नांदेड व जालना जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, लातूर जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, तर परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धाराशिव जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. तसेच परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत किमान तापमान २२ अंश सेल्सिअस, तर लातूर, नांदेड व बीड जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८६ ते ९२ टक्के आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ८५ टक्के राहील..पश्चिम विदर्भआज (ता.२१) बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ८ ते १२ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग अमरावती जिल्ह्यात १० कि.मी., तर बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत ताशी १५ कि.मी. राहील. कमाल तापमान बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस, तर अमरावती जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस आणि अकोला जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ टक्के राहील..मध्य विदर्भआज (ता.२१) वर्धा जिल्ह्यात ७ मि.मी., यवतमाळ जिल्ह्यात ९ मि.मी. व नागपूर जिल्ह्यात १४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. नागपूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ७ कि.मी., तर वर्धा व यवतमाळ जिल्ह्यांत १० ते १२ कि.मी. राहील. कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ९४ टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता ६८ टक्के राहील..पूर्व विदर्भआज (ता.२१) गोंदिया जिल्ह्यात ४ मि.मी., तर चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून व उत्तरेकडून राहील. तर गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांत ताशी २ ते ३ कि.मी., तर भंडारा जिल्ह्यात ४ कि.मी. आणि चंद्रपूर जिल्ह्यात ताशी ८ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस, किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ सर्वच जिल्ह्यात राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ९६ टक्के, तर गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ९८ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० टक्के राहील..पश्चिम महाराष्ट्रआज (ता.२१) कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत ३ ते ४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. तर सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग कोल्हापूर जिल्ह्यात ताशी ६ कि.मी., तर सातारा व पुणे जिल्ह्यांत ताशी ७ ते ८ कि.मी. राहील. सांगली, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांत वाऱ्याचा वेग ताशी १० ते ११ कि.मी. राहील. कमाल तापमान पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमान सांगली व सातारा जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, सोलापूर जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सांगली, सातारा, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ९६ टक्के व दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ७० टक्के राहील..कृषी सल्लापावसात उघडीप मिळताच काढणीस तयार मुगाच्या व उडदाच्या शेंगा तोडून घ्याव्यात.हळद पिकात उघडे पडलेले कंद मातीने झाकून भरणी करावी.भाजीपाला पिकांचे कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी निरिक्षण करावे. आवश्यकता भासल्यास कीडनाशकांची शिफारशीनुसार फवारणी करावी.रब्बी ज्वारी, करडईची पेरणी करावी.फळबागांमधून पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.