Maharashtra Rain Forecast: राज्यात पावसाने उघडीप दिली असली तरी तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज (ता. ११) रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेर, दातिया, मध्य प्रदेशमधील कमी दाबाचे केंद्र, दाल्तोंगंज दिघा ते पूर्व - मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर सक्रिय होता. मध्य भारत आणि लगतच्या दक्षिण भारतात समुद्र सपाटीपासून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांमुळे हवेचे जोडक्षेत्र तयार झाले आहे..सोमवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तसेच सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत ताम्हिणी येथे सर्वाधिक ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे..Rain Update: घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा; उर्वरित राज्यात हलक्या सरींची शक्यता .आज (ता. ११) रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी ऊन -सावल्यांच्या खेळात हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..कमी दाब क्षेत्र मध्य प्रदेशाकडे सरकलेमध्य प्रदेश परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली असून, उद्या (ता. १२) या भागात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत..सोमवारी (ता. १०) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३०.२---२२.४अहिल्यानगर---निरंक---२४.३धुळे---३२---२१.४जळगाव---३३---२३.७जेऊर---३२.५---२२.५कोल्हापूर---२९.५---२२.५महाबळेश्वर---२०---१८.Maharashtra Weather Forecast: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा.मालेगाव---२९---२२.६नाशिक---३०.२---२२.४निफाड---३१.२---२३.४सांगली---३१.६---२२.१सातारा---३०---२२.८सोलापूर---३३.२---२२.५सांताक्रूझ---३१.५---२६.७डहाणू---३३---२३.१ .रत्नागिरी---३१.४---२५.४छत्रपती संभाजीनगर---३१.८---२२.५धाराशिव---३०.१---२१परभणी---३२---२२.५परभणी (कृषी)---३२.२---२१.३अकोला---३२.५---२५.३अमरावती---३०---२३.९.ब्रह्मपूरी---२९.८---२३बुलडाणा---२९.८---२३चंद्रपूर---३०.२---२२.२गडचिरोली---निरंक---२४.६गोंदिया---निरंक---२२.४नागपूर---२९.६---२२.६वर्धा---३१.४---२५वाशीम---निरंक---२०.६यवतमाळ---३०.६---१८.४.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---२१.४---३३पश्चिम महाराष्ट्र---१८---३३.२कोकण---२३.१--३३मराठवाडा---२१---३२.२विदर्भ---१८.४---३२.५जोरदार पावसाची शक्यता (येलो अलर्ट)रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.