Weekly Weather: राज्यात उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता
IMD Weather Update: महाराष्ट्रावर आज (ता. २७) १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रात पावसात उघडीप राहणे शक्य आहे. तर पश्चिम विदर्भ, मध्य विदर्भ व पूर्व विदर्भात अल्प पावसाची शक्यता राहील.