Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रावर आज (ता.१८) आणि उद्या (ता.१९) हवेचे दाब १०१० हेप्टापास्कल इतके राहतील. त्यानुसार हवामान बदल होऊन सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. आज आणि उद्या हवेचे दाब १०१० हेप्टापास्कल इतके होताच, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांत पावसाची शक्यता निर्माण होईल..मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, बीड जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील काही भागांसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. मंगळवार (ता.२०)पासून शनिवार (ता.२४)पर्यंत हवेच्या दाबात वाढ होऊन ते १०१२ हेप्टापास्कलपर्यंत इतके वाढतील. त्यामुळे पावसाची शक्यता कमी राहील..Weekly Weather: उष्ण, कोरड्या हवामानाची शक्यता.आज (ता.१८) पासून सकाळी थंड व दुपारी उष्ण व कोरडे हवामान राहील. प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान होलुस, पनामाजवळ ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले असल्याने ‘एल-निनो’चा प्रभाव अधिक राहील. मात्र त्याच वेळी हिंदी महासागराच्या पश्चिमी भागात समुद्राच्या पाण्याचे तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले असल्याने आयओडी पॉझिटिव्ह होत आहे. त्यामुळे ‘एल-निनो’चा प्रभाव कमी होईल. बंगालच्या उपसागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले असल्याने या पुढील काळातही हलक्या पावसाची शक्यता निर्माण होईल. मात्र या वर्षी ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहील..कोकणसिंधुदुर्ग जिल्ह्यात १० मि.मी., रत्नागिरी जिल्ह्यात ६ मि.मी. आणि रायगड जिल्ह्यात ३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, रत्नागिरी जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, तर रायगड जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. .कमाल तापमान ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी, रायगड व पालघर जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ८७ टक्के, तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ९१ ते ९३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३५ टक्के, तर रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांत ५० ते ५५ टक्के आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६० टक्के इतकी राहील..उत्तर महाराष्ट्रआज (ता.१८) नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस आणि जळगाव जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते २४ टक्के राहील. दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील..मराठवाडाधाराशिव जिल्ह्यात ६ मि.मी., लातूर जिल्ह्यात ५ मि.मी., बीड जिल्ह्यात २ मि.मी. आणि नांदेड जिल्ह्यात ३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत अत्यल्प पावसाची शक्यता राहील. कमाल तापमान लातूर जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, तर धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धाराशिव जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, लातूर व हिंगोली जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, तर नांदेड, बीड, परभणी, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ८० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३२ टक्के राहील..Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर.पश्चिम विदर्भअकोला व वाशीम जिल्ह्यांत अत्यल्प पावसाची शक्यता असून बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ कि.मी. राहील. कमाल तापमान अकोला जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस, तर बुलढाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वाशीम जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, तर बुलढाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६४ ते ७० टक्के व दुपारची सापेक्ष आर्द्रता २७ ते ३० टक्के राहील..मध्य विदर्भवर्धा व नागपूर जिल्ह्यांत अत्यल्प पावसाची शक्यता असून यवतमाळ जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. सर्वच जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७३ टक्के व दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ टक्के राहील..पूर्व विदर्भचंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २ ते ३ मि.मी. हलक्या पावसाची शक्यता आहे. तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत पावसात उघडीप राहील. कमाल तापमान गोंदिया जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ७७ टक्के, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ९० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात ४० टक्के राहील..पश्चिम महाराष्ट्रकोल्हापूर जिल्ह्यात १३ मि.मी. सांगली जिल्ह्यात १० मि.मी., सातारा जिल्ह्यात ९ मि.मी., सोलापूर जिल्ह्यात ६ मि.मी., पुणे जिल्ह्यात ६ मि.मी. आणि अहिल्यानगर जिल्ह्यात १ मि.मी. पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ४ कि.मी. राहील. अहिल्यानगर जिल्ह्यात वाऱ्याचा वेग ताशी ६ कि.मी. व सोलापूर जिल्ह्यात ताशी ९ कि.मी. राहील. कमाल तापमान कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. .सातारा व पुणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, तर सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० टक्के व दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ टक्के राहील.(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.