Maharashtra Rain Alert: कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा
Rain Update: आज (ता. १८) कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.