Pune News: राज्यातील काही ठिकाणी मागील ३ दिवसांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. तर यवतमाळ, नांदेड आणि वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटही झाली. याचा पिकांना फटका बसला आहे. हवामान विभागाने आज राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला आहे. .राज्यातील काही भागात आज पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे..Maharashtra Rain Forecast: यवतमाळ, चंद्रपूर येथे वादळी पावसाची शक्यता.तसेच मराठवाड्यातील बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातही ढगाळ हवामानासह काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. .Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागात पिकांचे नुकसान.पूर्व विदर्भातही वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भंडारा, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्याही राज्यातील काही भागात ढगाळ हवामानाची शक्यता आहे. दोन दिवसांनंतर तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे..राज्यात उन्हाचा चटकाही वाढत आहे. अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर भारतातही थंडी कमी होत आहे. पंजाबमधील गुरुदासपूर येथे देशातील सर्वात कमी ९ अंशाची नोंद झाली. तर तमिळनाडूतील इरोड येथे देशातील सर्वाधिक ३७.८ अंश तापमान नोंदले गेले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.