Maharashtra Weather: राज्यात ऊन सावल्यांच्या खेळ सुरू असतानाच, पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. यातच उन्हाचा चटका वाढल्याने कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांवर गेला आहे. आज (ता. १४) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजासंह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाच्या उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे..मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानाच्या श्रीगंगानगरपासून हिस्सार, गोरखपूर, मुझफ्फरपूर ते मणिपूरपर्यंत सक्रिय आहे. उत्तर बंगालचा उपसागर आणि दक्षिण बांग्लादेश आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ४.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. बिहारपासून मणिपूरपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे..सोमवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ३७.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १७.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात पावसाने उघडीप दिली असून, अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३३ ते ३७ अंशांच्या दरम्यान आहे. उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरू लागला आहे..आज (ता. १४) कोकणातील पालघर, रायगड, मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची उघडिप राहण्याची शक्यता आहे. ऊन-सावल्यांच्या खेळात तुरळक ठिकाणी हलक्या सरी येण्याची शक्यता आहे. तसेच उन्हाचा चटका आणि उकाड्यातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे..Maharashtra Rain Update: राज्यात पावसाची उघडीप शक्य.सोमवारी (ता. १३) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३०.५---२३.३अहिल्यानगर---निंरक---२४.५धुळे---३५.४---१९.४जळगाव---३७.०---२३.२जेऊर---३४.०---१९.०कोल्हापूर---३०.५---२३.१महाबळेश्वर---२१.८---१७.४.मालेगाव---३४.२---२४.०नाशिक---३०.९---२३.०निफाड---३३.३---२३.१सांगली---३१.७---२२.२सातारा---२९.७---२३.७सोलापूर---३५.८---२३.४सांताक्रूझ---३२.६---२७.४डहाणू---३४.३---२५.९रत्नागिरी---३२.०---२७.४.Weekly Weather: कोकण, विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता.छत्रपती संभाजीनगर---३४.६---२३.२धाराशिव---३१.६---२१.८परभणी---३५.३---२३.६परभणी (कृषी)---३४.३---२२.३अकोला---३५.४---२६.०अमरावती---३०.०---२३.९भंडारा---३३.८---२५.०बुलडाणा---३४.०---२३.३ब्रह्मपुरी---३५.२---२५.२.चंद्रपूर---३६.०---२७.२गडचिरोली---३३.२---२६.४गोंदिया---३४.९---२४.५नागपूर---३२.६---२३.४वर्धा---३३.०---२६.०वाशीम---३२.८---२१.८यवतमाळ---३४.६---२१.०.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---१९.४---३७.०पश्चिम महाराष्ट्र---१७.४---३५.८मराठवाडा---२१.४---३५.३विदर्भ---२१.०---३६.०कोकण---२५.९---३४.३विजांसह पावसाची शक्यता :पालघर, रायगड, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर, जालना..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.